मुंबई येथे झालेल्या ३३ व्या राज्य अजिंक्यपद स्केटिंग स्पर्धेत जिल्हा संघास चार सुवर्ण दोन रौप्य पदकाचा मान…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

विनायक जितकर

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते विजेता स्केटिंग खेळाडूंचा सत्कार…

कोल्हापूर – कोल्हापूर रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य स्केटिंग असोसिएशन यांच्या वतीने मुंबई येथील विरार या ठिकाणी झालेल्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग ट्रॅक वरील स्पर्धेत मान्यता प्राप्त ॲमेॅच्युअर कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग असोसिएशनच्या वतीने जिल्हा स्केटिंग संघ पाठविण्यात आला होता.

या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून २९ जिल्ह्यातील अंदाजे ९८७ स्केटिंग खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये जिल्हा संघटनेच्या खालील स्केटरानी विजेते पद मिळवले. १) वयोगट (७ ते ९ कॉड स्केटिंग) पृथ्वीराज रणजीत पिराई एक सुवर्ण २) (वयोगट ७ ते ९ इनलाइन स्केटिंग) रीवान पृथ्वीराज शेळके एक रौप्य ३) (वयोगट ९ ते ११ काॅड स्केटिंग) अवनी अनुप जाधव तीन सुवर्ण ४) (स्पेशल बॉईजगट) ओम मेघशाम जगताप एक रोप्य असे यश संपादन केले आहे.

या सर्वांचा शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे स्केटिंग रिंग विवेकानंद कॉलेज ताराबाई पार्क या ठिकाणी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या सर्वांना जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अनिल कदम, ॲड. धनंजय पठाडे, संजय फराकटे, जगदीश दळवी, प्रा. आकाराम पाटील, प्रा. संभाजी पाटील, आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक डॉ. महेश अभिमन्यू कदम यांचे मार्गदर्शन लाभले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.