बेस्ट उपक्रमाच्या ताब्यातील स्वमालकीच्या 3337 बसेसची तातडीने पूर्तता करावी…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

बेस्ट उपक्रमाच्या उपाययोजना करण्याबाबत माजी बेस्ट अध्यक्ष यांच्या शिष्टमंडळांने घेतली आयुक्तांची भेट…

मुंबई – सध्या बेस्ट उपक्रमाकडे स्वमालकीच्या फक्त १६८६ बसेस असून सन २०१९ मध्ये मुंबई महानगरपालिकेचे तात्कालीन आयुक्त प्रविण परदेशी साहेब यांच्या दालनात झालेल्या कराराप्रमाणे बेस्ट उपक्रमाच्या स्वमालकीच्या ३३३७ एवढ्या बसेस कायम ठेवून त्यावरील असलेल्या बसेस कंत्राटी असतील, परंतु सध्या बेस्ट उपक्रमाकडे फक्त 1686 एवढ्याच स्वमालकीच्या बसेस असून सन 2025 नंतर स्क्रॅप झाल्यामुळे एकही बस शिल्लक राहणार नाही, याबाबत युवासेना प्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्यजी ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहून त्याबाबत या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

स्वमालकीच्या बसेस घेण्यासाठी राज्य शासन आणि मुंबई महानगरपालिका प्रशासन यांना तातडीने आदेश देण्याबाबत सूचना केलेली आहे, त्या अनुषंगाने आज बेस्टचे माजी चेअरमन आशिष चेंबूरकर, अनिल कोकीळ ,अनिल पाटणकर बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत, सरचिटणीस रंजन चौधरी, उपाध्यक्ष उमेश सारंग, मनोहर जुन्नरे, गणेश शिंदे यांनी महानगरपालिका आयुक्त इकबाल चहल यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली, आणि निवेदन देण्यात आले. सदर चर्चेत आयुक्त यांनी बेस्ट च्या मालकीचा ताफा ३३३७ कायम ठेवण्यासाठी निधीची पूर्तता करण्यात येईल. त्याबाबत राज्य शासन आणि केंद्र सरकारला सुद्धा विनंती करण्यात येईल असे सांगितले. आणि लवकरात लवकर बेस्टच्या स्वतःच्या मालकीच्या बसेस घेण्याबाबत तत्वता मान्यता दिली. याबाबत लवकरात लवकर कार्यवाही होणे अतिशय आवश्यक आहे कारण आत्ता स्वमलकीच्या बसेस साठी तयारी केली तर एक ते दीड वर्षानंतर सदर बसेस टप्प्या टप्प्याने येतील, त्यानुसार लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी, अशी विनंती शिष्टमंडळाने आयुक्तांना केली.

या बैठकीमध्ये करारामध्ये नमूदअसलेले आणि मान्य केलेले मुद्दे निदर्शनास आणून बेस्ट उपक्रमाच्या ३३३७ एवढ्या बसेस कायम ठेवणे हे मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी असेल,असे नमूद असल्यामुळे महापालिका प्रशासनाने कराराचे पालन करून तातडीने सदर बसेस घेण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी. आणि त्यासाठी आस्थापनावर आवश्यक असणाऱ्या कर्मचाऱ्यांची भरती तातडीने करण्यात यावी. सदर करारात नमूद केल्याप्रमाणे मुंबई महानगरपालिका 100 कोटी रुपये बेस्ट उपक्रमाला अदा करेल त्याप्रमाणे सदर रक्कम अद्याप बेस्ट उपक्रमाला मिळालेली नाही.

त्या रक्कमेची तातडीने पूर्तता करण्यात यावी अशी विनंती आयुक्तांना करण्यात आली, त्याबाबतही लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासित केले. बेस्ट ही मुंबईची जीवन वाहिनी असून ती टिकवण्यासाठी ही मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी असल्याचे शिष्टमंडळाने ठासून सांगितले त्यावर आयुक्त यांनी कराराप्रमाणे सदर बाबतीत लवकर लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल असे आश्वासित केले.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.