महाराष्ट्र ही संतांची आणि शौर्याची भुमी- सतेज पाटील

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श आपल्या जीवनात घेणं गरजेचंसतेज पाटील
शिवाजी ट्रेल ट्रेक, एनसीसी फ्लॅगआमदार सतेज पाटील यांच्या हस्ते

आमदार सतेज पाटील यांनी आपले पूर्ण मार्गदर्शक भाषण हे इंग्रजी मधून केले

कोल्हापूर- छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास, शौर्य, पराक्रम, संस्कृती आणि युद्धनीती कला यांचा अभ्यास करण्यासाठी शिवाजी ट्रेल ट्रेक महत्त्वपूर्ण आहे, तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श आपल्या जीवनात घेणं गरजेचं आहे, अस प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केलं . आज कोल्हापुरातील एनसीसी ग्रुप हेड क्वार्टर भवनमध्ये आयोजित शिवाजी ट्रेल ट्रेकमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते . छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या कौशल्य आणि युद्धनीतीचा वापर करत, पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटका करून घेतल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र ही संतांची आणि शौर्याची भुमी आहे तसच कोल्हापूरला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांचा ऐतिहासिक वारसा लाभल्याचही त्यांनी सांगितलं . यावेळी आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते एनसीसी विद्यार्थ्यांना फलॅग दाखवल्यानंतर हे विद्यार्थी पन्हाळा ते विशाळगड या शिवाजी ट्रेल ट्रेक मोहिमेसाठी रवाना झाले .

शाळा – महाविद्यालयांतील एनसीसीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास, कार्यपद्धती, शौर्य, पराक्रम, युद्ध कला याबाबतची माहिती मिळावी, या उद्देशानं कोल्हापुरातील एनसीसी ग्रुप हेड क्वार्टरच्यावतीनं, एनसीसी भवनमध्ये शिवाजी ट्रेल ट्रेकच आयोजन ४१ वर्षांपासून केलं जातय . यंदा १८ ते २६ नोव्हेंबरपर्यंत आयोजित केलेल्या या ऑल इंडिया शिवाजी ट्रेल ट्रेकमध्ये महाराष्ट्र राज्यासह, कर्नाटक, गोवा, तामिळनाडू,आंध्र प्रदेश, पाँडेचेरी इथल्या शाळा आणि महाविद्यालयांतील १ हजार २५ एनसीसीचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत .तीन बॅच विद्यार्थ्यांसाठी तर एक बॅच विद्यार्थिनींसाठी ठेवण्यात आलीय . याठिकाणी पन्हाळा ते विशाळगड परिसरातील शिवाजी ट्रेल ट्रेकच आयोजन केलेल्या गावांबाबतच्या माहितीची प्रतिकृती तयार करण्यात आली होती .

आज याठिकाणी आमदार सतेज पाटील यांनी भेट दिली . ब्रिगेडियर अभिजीत वाळिंबे यांनी आमदार सतेज पाटील यांचं स्वागत केलं .छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास शौर्य, पराक्रम आणि युद्ध कला समजण्याच्या उद्देशानं, या एनसीसीच्या विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांनी पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटका करून, पराक्रम दाखवत, विशाळगड गाठल्याबाबतची माहिती, तसच यावेळी घडलेल्या पावनखिंडीतील रणसंग्रामाची माहिती, कोल्हापुरातील विवेकानंद महाविद्यालयातील एनसीसीचे विद्यार्थी साद हसबे, अनुराधा रायमाने, चेतन पोवार आणि नेहा मेहरवाडे यांनी सांगितली .

छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास, संस्कृती, कार्यपद्धती, शौर्य, पराक्रम, युद्धनीती आणि कला यांचा अभ्यास करण्यासाठी शिवाजी ट्रेल ट्रेक महत्त्वपूर्ण आहे,अस प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले . एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श आपल्या जीवनात घेणं गरजेच आहे, असं त्यांनी सांगितलं . छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या कौशल्य आणि युद्ध नितीच्या बळावर पन्हाळ्यातून सुटका करून, पराक्रमाच्या जोरावर, विशाळगड गाठल्याच त्यांनी नमूद केल . महाराष्ट्र ही संतांची आणि शौर्याची भुमी आहे . कोल्हापूरला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांचा ऐतिहासिक वारसा लाभला असल्याचं त्यांनी सांगितलं . कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरासह अनेक देवदेवतांची प्राचीन मंदिरं ,राजवाडे, आणि गड – किल्ले, कोल्हापूर जिल्ह्यात असून, हे अभिमानास्पद असल्याचं त्यांनी नमूद केलं . हा शिवाजी ट्रेल ट्रेक म्हणजे शारीरिक क्षमतेबरोबरच बौद्धिक क्षमता वाढवणारा असल्याच त्यांनी सांगितलं .एनसीसीच्या विद्यार्थ्यांना शिवाजी ट्रेल ट्रेकची ही मोठी संधी लाभली असून, या संधीचं सोनं करावं,अस आमदार सतेज पाटील यांनी आवाहनही त्यानी केले. . एनसीसी भवन तसच एनसीसीच्या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य करू असा विश्वास अशी त्यांनी दिला . यावेळी एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि नॅशनल कॅडेट कोअर की जय, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता . यादरम्यान आमदार सतेज पाटील यांनी एनसीसीच्या शिवाजी ट्रेल ट्रेकमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना फ्लॅग दाखवला, त्यानंतर हे विद्यार्थी पन्हाळा ते विशाळगड या शिवाजी ट्रेल ट्रेकच्या पन्हाळा,मलकापूर,बांबवडे, पांढरपाणी, गजापूर, विशाळगड या मार्गावरील मोहिमेसाठी रवाना झाले .

कार्यक्रमानंतर आमदार सतेज पाटील यांनी एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरच्या डायरीमध्ये आपला अभिप्राय नोंदवला .
विद्यार्थी दशेपासूनच छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास, शौर्य आणि पराक्रम याची माहिती समजावी, या उद्देशानं या शिवाजी ट्रेल ट्रेकच नियोजन केले असल्याचे ,ब्रिगेडियर अभिजीत वाळिंबे म्हणाले .यावेळी एनसीसी ग्रुपचे ऑफिसर कर्नल संदन मिश्रा, कर्नल अजय थोरात, कर्नल सुहास काळे, कर्नल समीर मोहिते, सुभेदार मेजर सुरेंद्र भोसले, सुभेदार प्रशांत जमनिक, सीएचएम बाजीराव गुरव,हवालदार दयानंद यादव, सुभेदार राजाराम आढाव यांच्यासह एनसीसीचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या .

 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.