डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामुहिक प्रोत्साहन योजने अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी मोफत निवासी उद्योजकता विकास कार्यक्रम…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी मोफत निवासी उद्योजकता विकास कार्यक्रम…

कोल्हापूर – उद्योग संचालनालय व जिल्हा उद्योग केंद्र, कोल्हापूर यांच्या सहयोगाने महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED)कोल्हापूरद्वारे महाराष्ट्र उद्योजक, व्यापार व गुंतवणूक सुलभता कक्ष MAITRI मुंबई यांच्या सहकार्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामुहिक प्रोत्साहन योजने अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी पुणे येथे १८ दिवसीय मोफत निवासी उद्योजकता विकास कार्यक्रमाचे (REDP) आयोजन करण्यात येत आहे.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

अनुसूचित जाती सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींनी उद्योग-व्यवसाय क्षेत्राकडे वळून स्वत:चा स्वयंरोजगार निर्माण करावा हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. कार्यक्रमात सहभागी प्रशिक्षणार्थींना उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, विविध क्षेत्रातील उद्योग संधी, उद्योगाची निवड, बाजारपेठ पाहणी, उद्योग उभारणीचे विविध टप्पे, बाजारपेठ व्यवस्थापन, उद्योगा संबंधित कायदे, सिद्धी प्रेरणा प्रशिक्षण, हिशोब पद्धती, प्रकल्प अहवाल तयार करणे, उद्योगांना प्रत्यक्ष भेटी, डिजिटल मार्केटिंग, विविध शासकीय कर्ज योजना, सोयी सवलती आणि कार्य प्रणाली, तसेच उद्योग व्यवस्थापन याबाबत शासकीय अधिकारी व तज्ज्ञांमार्फत विस्तृत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

  • प्रशिक्षण कार्यक्रमाची विस्तृत माहिती व इच्छुकांचे प्रवेश अर्ज भरुन घेण्यासाठी एम.सी.ई.डी. कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने शुक्रवार दि. २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता मोफत उद्योजकता परिचय कार्यक्रमाचे आयोजन एम.सी.ई.डी.हॉल, द्वारा उद्योग भवन, महावीर गार्डन समोर, कोल्हापूर येथे करण्यात आले असून इच्छुकांनी उपस्थित रहावे. उपस्थितांकडून प्रवेश अर्ज भरुन घेण्यात येणार आहेत. प्राप्त प्रवेश अर्जामधून निवड समिती मार्फत प्रत्यक्ष मुलाखत घेऊन कोल्हापूर जिल्ह्यामधून ४० प्रशिक्षणार्थींची निवड पुणे येथे होणाऱ्या निवासी उद्योजकता विकास कार्यक्रमासाठी करण्यात येणार आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण प्रशिक्षण मोफत असून प्रशिक्षणार्थींची प्रशिक्षण कालावधी दरम्यान चहा, नाष्टा, भोजन व निवास व्यवस्था संस्थेमार्फत केली जाणार आहे. प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवार हा अनुसूचित जाती प्रवर्गातील, किमान ८ वी पास, महाराष्ट्राचा किमान १५ वर्षापासूनचा रहिवाशी, उद्योग करण्याची प्रबळ इच्छा व १८ ते ५० वयोगटातील असावा. अनुसूचित जाती प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी प्रवेश अर्ज व अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी प्रवीण कायंदे व वनिता पाटील एम.सी.ई.डी. द्वारा उद्योग भवन, महावीर गार्डन समोर, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजुला, कोल्हापूर येथे करावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजयकुमार पाटील यांनी केले आहे.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.