बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी असे प्रकार घडवून आणणे निषेधार्ह – एकनाथ शिंदे

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही सगळ्यांची जबाबदारी…

मुंबई – बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सामंजस्याची भूमिका घेऊन स्मृती दिनाच्या एक दिवस आधी स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेबांना अभिवादन करतो. मात्र त्यांच्या स्मृतीदिनाला गोंधळ घालून गालबोट लावण्याचा केलेला प्रयत्न हा निंदनीय असून त्याचा करावा तेवढा निषेध कमीच असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

स्वर्गीय बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न कुणीही करू नये अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. खरंतर मुख्यमंत्री असल्यामुळे प्रत्यक्ष स्मृतीदिनी जाऊन अभिवादन केले तरीही आपल्याला कुणी अडवू शकणार नाही. मात्र तरीही तसे करणे आपण टाळले कारण यादिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये अशीच माझी इच्छा होती.

आजही दरवर्षीप्रमाणे बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी स्मृती स्थळावर जाऊन मी दर्शन घेईपर्यंत तिथे कुणीही आले नव्हते,मात्र मी निघाल्यावर तिथे उबाठा गटाचे नेते अनिल देसाई आणि अनिल परब तिथे आले आणि आमच्या विरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली. तसेच महिला भगिनींबद्दल अपशब्द वापरले. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची ही शिकवण नसून यांच्या स्मृतिदिनी विनाकारण अशांतता निर्माण करण्याचा केलेला प्रयत्न हा निंदनीय असून त्याचा करावा तेवढा निषेध कमी आहे असे मत शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.