खासदार धनंजय महाडिक यांनी आयोजित केलेल्या दिवाळी फराळाला आजी-माजी मंत्री, आमदार, खासदारांची उपस्थिती,
फराळाच्या निमित्ताने रंगला गप्पांचा फड आणि स्नेहमेळावा
महासैनिक दरबार लॉनच्या हिरवळीवर सोमवारी सायंकाळी खासदार धनंजय महाडिक यांनी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जिल्हयातील आजी माजी मंत्री, आमदार, खासदार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची या सोहळ्याला उपस्थिती होती. दरम्यान महाडिक परिवारावर शुभेच्छांचा वर्षाव करत, उपस्थितांनी फराळाचा मनमुराद आनंद घेतला.
भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून यंदा दीपावली फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने ताराबाई पार्कातील महासैनिक दरबार हॉलच्या लॉनवर सोमवारी सायंकाळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी जमली होती. खाद्यपदार्थ आणि फराळाचा आस्वाद घेत, सर्वपक्षीय नेत्यांनी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एकमेकांशी संवाद साधत शुभेच्छांचा वर्षाव केला. तर व्यासपीठावर सतार, व्हायोलिन, बासरी, ऑक्टोपॅड, तबला, कीबोर्ड अशा वाद्यांच्या सुरावटीने वातावरणात वेगळेच मांगल्य आणि चैतन्य निर्माण झाले होते.
खासदार धनंजय महाडिक, भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, बी चॅनलचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक, भीमा साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक, युथ आयकॉन कृष्णराज महाडिक, वैष्णवी महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, उद्योजक स्वरूप महाडिक यांनी मान्यवरांचे स्वागत केले. दीपावली फराळ कार्यक्रमाला श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, चंदगडचे आमदार राजेश पाटील, कर्नाटकचे उद्योजक आणि खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार संजयबाबा घाटगे, राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, भरमू आण्णा पाटील, माजी खासदार निवेदिता माने, समरजीतसिंह घाटगे, भाजपा राज्य कार्यकारिणीचे महेश जाधव, राहुल चिकोडे, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल देसाई, राजवर्धन निंबाळकर, राष्ट्रवादीचे ए.वाय. पाटील, संग्रामसिंह कुपेकर, माजी नगरसेवक सत्यजीत कदम, प्रा. जयंत पाटील, माजी महापौर आर. के. पोवार, मुरलीधर जाधव, बाबासो पाटील, बिद्रीचे व्हाईस चेअरमन यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शिवाय जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि कर्मचारीसुध्दा या सोहळ्याला उपस्थित होते. सर्वांनीच दीपावली फराळाचा आस्वाद घेत गप्पांचा फड रंगवला. यानिमित्ताने जणू सर्वपक्षीय स्नेहमेळावा पार पडला.
|