पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
|
कोल्हापूर शहर कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप
कोल्हापूर, :विकास आणि गोरगरिबांची सेवा हीच राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. महिनाभरात सर्व समित्या आणि महामंडळाच्या नियुक्त्याही पूर्ण करणार आहोत, असेही मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.कोल्हापुरात कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नूतन कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पक्षाचे शहराध्यक्ष आदिल फरास होते.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...
पालकमंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या रूपाने पक्षाला खंबीर आणि मजबूत नेतृत्व मिळाले आहे. पक्षीय संघटनेच्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा करा आणि पक्ष संघटना वाढविण्यासाठी वेळ द्या.शहराध्यक्ष आदिल फरास म्हणाले, पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी पक्ष वाढीसाठी नेहमीच संघटनात्मक कामाला बळ दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची ध्येयधोरणे घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी नव्या दमाने आणि जिद्दीने कार्यरत राहू.
|
 |
| यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस व स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर, माजी उपमहापौर परीक्षीत पन्हाळकर, केडीसीसी बँकेचे माजी संचालक असिफ फरास, माजी नगरसेवक विनायक फाळके, माजी नगरसेवक अनिल कदम, माजी नगरसेवक प्रकाश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. जहिदा मुजावर, महिला शहराध्यक्षा सौ. रेखा आवळे, माजी नगरसेवक उत्तम कोराने, माजी नगरसेवक सुनील पाटील, माजी नगरसेवक प्रकाश गवंडी, माजी नगरसेवक प्रकाश कुंभार, फिरोज सौदागर आदी प्रमुख उपस्थित होते.स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर युवती अध्यक्षा सौ. पूजा साळोखे यांनी केले. सूत्रसंचालन रामेश्वर पत्की यांनी केले. आभार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर युवकचे अध्यक्ष महेंद्र चव्हाण यांनी मानले. |
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.
Post Views: 524