कोल्हापूर : खरतर आजीबाई गहिवरल्या.. डाेळ्यात आनंदाश्रू हाेते.. इतकी वर्ष अंधारात, चाचपडत वागलेल्या आजीबाईंना आता लख्ख प्रकाशात कस वागायचं हे जाणून घ्यायचं हाेतं. कारण ही तसेच हाेते. वयाच्या ६२ वर्षानंतर इथं लख्ख प्रकाश दिसत हाेता. माेठमाेठ्या शहरात सर्वत्र प्रकाशमान दिवस हाेते. मात्र आजरा सारख्या तालुक्यातील गांधीनगर भागातील नेवरेकर कॉलनीत घडलेला हा प्रकार निश्चितच काैतुकास्पद हाेता. महावितरणने या प्रकरणाची गांभिर्याने दखल घेत ही कामगिरी पार पाडली हाेती. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा महावितरणच्या वीज कर्मचाऱ्यांनी एका आजीबाईंच्या घरात लाईट फिटिंगसह मीटर जोडून नवीन वीजजोडणी दिली. अन् दिवाळीला आजीच्या जीवनात ‘आपुलकीचा प्रकाश’ पाडला. यामुळे आजीबाई लयी खुश हाेत्या. |
||||
![]() |
||||
| दिवाळीच्या पूर्वसंध्येला कार्यालयात येऊन आजीबाईनी लाईटची मागणी केली. आजीकडे वीजेची नवीन जोडणी देण्यासाठी घरात कुठलीच सुविधा नव्हती, त्यांची आर्थिक परिस्थिती गंभीर असल्याचे वीज कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. क्षणाचाही विलंब न लावता कर्मचाऱ्यांनी पैसे जमा करुन त्या आजींच्या घरात वायरिंग व स्विच बोर्ड बसवून नवीन वीज जोडणी दिली.
महावितरणची ही बातमी देखील अधिक वाचकांनी वाचली.. २१ हजार ग्राहकांना मिळणार अखंडित वीज; घाटगे-पाटील उपकेंद्रात ३३/११ केव्हीचा नवीन ब्रेकर कार्यान्वित |
||||
|


















































