माणुसकीच्या भिंतीवर दातृत्वाचे थर – सलाम कोल्हापूरकर…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

विनायक जितकर

कोल्हापूरकरांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद दीड लाखाहून कपड्याचे हस्तांतरण…

कोल्हापूर – आमदार सतेज पाटील व मित्र परिवार यांच्या संकल्पेतून सीपीआर चौकात गेली दोन दिवस उभी असलेली माणुसकीची भिंतीची रविवारी सांगता झाली. दातृत्वान कोल्हापूरकारांनी उत्स्फूर्तपणे कपडे दान करीत भिंतीवर दातृत्वाचे थर चढविले. शनिवार व रविवार या दोन दिवसांत सुमारे दीड लाखाहून अधिक वापरण्यायोग्य जुने कपडे जमा झाले तितकेच कपडे गरजूंना वाटप करण्यात आले.

दरम्यान पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी उपक्रमाला भेट देवून सदिच्छा दिल्या. खरच हा अत्यंत समाजपयोगी उपक्रम आहे. माणुसकीच्या भिंतीला कोल्हापूकरांनी दिलेला प्रतिसाद सुखावणारा आहे. समाजातील गरजवंताच्या मदतीला यानिमित्ताने आपण उपयोगी पडलो ही भावना निश्चितच आनंद देणारी आहे. – महेंद्र पंडीत (जिल्हा पोलीस अधीक्षक) यंदाच्या वर्षीसह गेली काही वर्षे कोल्हापूरकर वापरण्यायोग्य कपडे देत आहेत. कोल्हापूरकरांनी आम्ही केलेल्या आवाहनाला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल आमदार सतेज पाटील यांनी आभार व्यक्त केले. 

दिपावलीच्या पुर्वसंध्येला २०१६ पासून ‘नको असले ते द्या, हवे ते घेवून जा’ हे ब्रिद वाक्य घेवून पुन्हा माणुसकीची भिंत उभी सीपीआर चौकात उभारली जाते. यंदाच्या वर्षी उभी रहिली. या दोन दिवसात साड्या, ब्लॅकेंट, शर्ट, पॅन्ट, टिशर्ट, लहान मुलांची कपडे स्वच्छ धुवून इस्त्री करुन भिंतीवर आणून दिली. कोल्हापूकरांनी उत्स्फूर्तपणे दिलेली जूनी परंतू वापरायोग्य कपडे गरजूंना यानिमित्ताने वाटप करण्यात आली. गरजू, आर्थिकदृष्ट्या तळात असलेल्या तिमीरांची दिवाळी यानिमित्ताने साजरी व्हावी याउद्देशाने उभारण्यात आलेली माणूसकीची भिंत कोल्हापुरकरांच्या दातृत्वाने सफल झाली. शनिवारी आणि रविवारी दोन दिवस सकाळी नऊ ते सायंकाळी आठवाजेपर्यंत वापरण्यायोग्य जुनी-नवी कपडे देण्यासाठी तसेच नेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

कोल्हापूरकरांच्या दातृत्वाचे अनुकरण करीत कोल्हापुरात इतर ठिकाणी, इचलकरंजी, पुणे, मुंबई, बिहार, छत्तीसगड यासह अन्य ठिकाणी माणुसकीच्या भिंती उभ्या राहिल्या. यंदाच्या वर्षी कोल्हापूरकर वापरण्यायोग्य नवे-जुने कपडे माणुसकीच्या भिंतीवर देवून गरीबांची दिवाळी आनंदी करण्यासाठी मदतीचा हात दिल्याबद्दल संयोजकांनी आभार मानले. या उपक्रमात आमदार सतेज पाटील यांच्यासह मुस्लिम बोर्डींगचे चेअरमन गणी आजरेकर, सुधर्म वाझे, प्रशांत पोकळे, संदीप नष्टे, सचिन पाटील, संतोष पाटील, सुखदेव गिरी, प्रसाद पाटील, अमर पाटील, सुरज पाटील, इम्तियाज मोमीन, निनाद कामत, डॉ. देवेंद्र रासकर, प्रविण पाटील आदींसह स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. सीपीआर चौकातील माणुसकीची भिंत या उपक्रमात कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कपडे घेवुन जाण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.