मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय मुलुंड विभागात डॉ. अब्दुल कलाम जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’…
मुंबई – मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय मुलुंड विभागात डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जाणारा ‘वाचन प्रेरणा दिन’ ‘जोशात साजरा झाला. सर्व वाचनप्रेमींनी डॉ अब्दुल कलाम यांचे किस्से सांगून यांच्या आठवणींना उजाळा दिला. शं .रा .पेंडसे यांनी वाचनाचे महत्व विषद केले. यंदाचे शिवराज्याभिषेक ३५० वे वर्ष असल्यामुळे भाग्यश्री नुलकर यांनी शिवराज्याभिषेक विषयक लेखाचे वाचन केले. प्रेरणा क्षीरसागर यांनी वाचन संस्कृतीची वृद्धि कशी होईल याबद्दल मत व्यक्त केले.
यावेळी युगंधरा वळसंगकर, वसंत गोळे, लक्ष्मण उपाध्ये, वैशाली अभ्यंकर, स्मिता नलावडे, दिनानाथ भिडे, श्रीम. शुभांगी सिनकर, श्रीम. रुही घोरमाडे-मगर, महेश कवठकर यांचा ही या कार्यक्रमात सहभाग होता. अवंती महाजन यांनी अनुवादित अलक कथा वाचन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यास ग्रंथसेवक व ग्रंथ सेविका यांचे सहकार्य लाभले.














































