पाटण शहराच्या वैभवात साकारत आहे किमया रहिवाशी संकुल…

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

पाटणमध्ये गृहनिर्माण क्षेत्रात शाश्वत बिल्डटेक यांनी आता दमदार पाऊल ठेवले आहे.

पाटण – पाटण तालुका म्हंटल की समोर आठवतो तो निसर्गरम्य परिसर, निसर्गाची देणगी जेवढी पाटण तालुक्यास लाभली कदाचित इतर कोणत्या तालुक्यास लाभली असेल. आशिया खंडातील पवनचक्कीचे सर्वात मोठे पठार, जैवविविधतेसाठी जागतिक वारसा संपन्न तसेच पर्जन्यमानात चेरापुंजीला देखील मागे टाकलेले पर्जन्यमान पाटण तालुका वासियांना खरोखर अभिमानास्पद आहे. सह्याद्रीच्या हिरव्यागार कड्यांमध्ये नटलेले तसेच महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना नदीतीरावरील पाटण शहर देखील आता आपल रूप विकसित करत आहे. पाटण शहर हे तालुक्याचे ठिकाण व मुख्य बाजारपेठ सर्व शासकीय कार्यालय असलेले हे शहर आता निवासी संकुलात परावर्तित होत आहे. पाटणमध्ये गृहनिर्माण क्षेत्रात शाश्वत बिल्डटेक यांनी आता दमदार पाऊल ठेवले आहे. ते आता साकारत आहेत पाटण तालुक्यातील डोंगरदऱ्यातील, मुंबईवासीय तसेच पाटणमध्ये सेवेनिमित्त वर्षानुवर्षे राहिलेल्या कर्मचारी यांच्या पाटण शहरातील हक्काच्या घराचे स्वप्न.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

शाश्वत बिल्डटेक यांनी पाटण शहरातील मोक्याचे ठिकाण देसाई गल्ली मध्ये प्रसिद्ध शिवलिंग मंदिर शेजारी किमया रहिवाशी इमारत बांधकामास प्रत्यक्ष सुरुवात केली आहे. यात 1BHK फ्लॅट 714 चौ.फूट.व 708 चौ.फूट.जागेमध्ये उपलब्ध असणार आहेत. तसेच 2BHK फ्लॅट हे 1020 चौ.फूट. व 1036 चौ.फूट.मध्ये उपलब्ध असतील. मीटिंग व बैठकीसाठी 2000 चौ.फूट. हॉल देखील उपलब्ध असणार आहे. या इमारत परिसरात दोनचाकी गाडी यांना स्वतंत्र पार्किंग तसेच चारचाकी यांना 10,000 चौ.फूट मध्ये प्रशस्त पार्किंग राहणार आहे. इमारत परिसरात वाहतूक ये-जा करण्यासाठी 20 फुटी अंतर्गत रस्ता तसेच बगीचाने अंतर्गत परिसर सुशोभित असणार आहे. विकासक यांनी बुकिंगसाठी खास सवलत देखील दिली आहे. हे सर्व पाटण नगरपंचायतच्या अधिकृत बांधकाम परवानाने होत असून २ वर्षात प्रत्यक्ष घराचा ताबा मिळणार आहे.

काही वर्षांपूर्वी पाटण तालुक्यातील विशेष करून मुंबई वासिय यांनी सुविधांसाठी पाटण शहरास पसंती देत येथे खुल्या जागेत गुंतवणूक केली आहे तसेच काही परजिल्हातील शासकीय कर्मचारी, महसूल कर्मचारी तसेच शिक्षक व व्यावसायिक यांनी योजनापूर्वक पाटण शहरास पस्ती दिली आहे याचा प्रत्यय सकाळी पाटण शहरात व्यायामसाठी फिरताना येतो. आरोग्य व पाटण तालुका असे सर्वमान्य समीकरण आपल्याला उत्तम आरोग्याची खात्री देते. एखादा परजिल्हातील मित्र व पाहुणे तालुक्यात आल्यास त्यांची तालुक्याप्रती भावना आपला निर्णय किती योग्य होता व आहे हे सांगून जाते. मध्यंतरी एका महोत्सवात मराठी सिनेसृष्टीतील दांपत्य यांनी देखील आपल्या दुसऱ्या घरासाठी पाटण तालुक्याविषयी व्यक्त केलेला मानस मोठा गौरव देतो. आता मात्र भविष्यातील पाटण तालुका हा वैशिष्ट्यपूर्ण असेल. तालुक्याची ओळख ही पर्यावरणपूरक असणार आहे. अलीकडे महाबळेश्वर नंतर पाटण तालुक्यास पर्यटनामध्ये पर्यटक पसंती देत आहेत तिन्ही ऋतूंचा सातारा जिल्हा हा नेहमीच पाटण तालुक्यास झुकते माप देतो. यातून तालुक्याचे उद्याचे भविष्य सांगायला कोणी ज्योतिषाची गरज आहे काय ? लवकरच जलपर्यटन बोटिंग सुरू होणार आहे.

महाबळेश्वर ते पाटण आता जलप्रवास देखील होत आहे तसेच चांदोली अभयारण्य देखील येत्या दोन वर्षात वाघांच्या आगमनाने सुरू होत आहे. पाटणच्या पठारांनी जागतिक लक्ष वेधले आहे त्यामुळे तिथे देखील अपेक्षित बरेच काही आहे. त्यामुळे भविष्यात बांधकाम क्षेत्रात व्यावसायिक स्पर्धा देखील होतील व घरांचे दर इतर अद्यावत शहरांसारखे निश्चित असतील. त्यामुळे आताच पाटण शहरात गुंतवणूक करणे ठीक राहणार आहे. शाश्वत बिल्डटेकचे मालक मेनिनाथ ओव्हाळ यांची बांधकाम क्षेत्रातील कारकिर्द व अनुभव लक्षणीय आहेत तसेच त्यांची या क्षेत्रातील प्रतिमा देखील चांगली असल्याने त्यांचा हा निवासी प्रकल्प तालुक्याच्या स्वप्नातील हक्काच्या घरासाठी आशादायक असणार आहे. यासाठी विकासक नेमिनाथ ओव्हाळ यांना या नंबर वर संपर्क करून माहिती मिळवू शकता 9665305633 – 9403347133

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.