कराडजवळ झालेल्या भीषण अपघातात पोलीस हवालदारसह कोल्हापुरातील तिघे ठार…
कराड – पुणे – बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावर चारचाकी वाहनाने ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने तीन जण जागीच ठार झाले. कराड तालुक्यातील पाचवड फाटा येथे ही दुर्दैवी घटना मृतांमध्ये कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार नितीन पवार यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
![]() |
![]() |
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील पाचवड फाटा येथे एक चारचाकी वाहन (एमएच ०१ एल ४५५८) कराडच्या दिशेने येत होते. यावेळी वाहनाने चालत्या मालाच्या ट्रकला मागून धडक दिली. या भीषण धडकेत चारचाकी वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे ट्रकच्या मागच्या बाजूने घुसला. या भीषण धडकेत चारचाकी वाहनातील तीन जण जागीच ठार झाले. मृत तिघेही कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे.
आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...
अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग हेल्पलाईन व कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले व अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले असून, अपघाताचा पुढील तपास पोलीस करत आहेत.





































































