बिद्रीच्या कारभाऱ्यांच्याकडून 10 कोटींचा अपहार.? – विजय बलुगडे

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

विनायक जितकर

बिद्री संचालक मंडळाविरुद्ध सभासद विजय बलुगडे यांची मुरगूड पोलिसांत तक्रार…

तुरंबे – बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन व संचालक मंडळाने निरंक कर्जावरील व्याजापोटी ९ कोटी ८१ लाखांचा अपहार केल्याची तक्रार तुरंबे (ता. राधानगरी) येथील कारखाना सभासद विजय रघुनाथ बलुगडे यांनी मुरगूड पोलिसांत दिली.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

बलुगडे यांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, कारखान्यावरील कर्ज २०१९ च्या ताळेबंदात निरंक दाखवण्यात आले आहे पण कारखान्याचे सत्ताधारी चेअरमन व संचालक मंडळाने सन २०२० ते २०२३ अखेर तीन वर्षांतील कर्जावरील व्याजापोटी ९ कोटी ८१ लाख रुपये दाखवून ते हडप केले आहेत. या अपहाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर खटला दाखल करावा, अशी मागणी या अर्जाद्वारे करण्यात आली आहे. या तक्रार अर्जाची दखल घेतल्याचे सांगून पोलिस निरीक्षक गजानन सरगर यांनी ही तक्रार जिल्हा पोलिसप्रमुखांकडे पाठविली आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून या तक्रार अर्जावरील चौकशी आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेमार्फत होण्याची शक्यता सरगर यांनी वर्तविली आहे.

बिद्री साखर कारखान्याची निवडणूक तोंडावर आली असताना सत्ताधाऱ्यांचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशावर डल्ला मारण्याचा हा प्रकार सत्ताधाऱ्यांकडून खरोखरीच झाला आहे का? याचा पर्दाफाश व्हावा, अशी मागणी शेतकरी व सभासद वर्गातून होत आहे.

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.