|
कोल्हापूरचा शाही दसरा देशभरात प्रसिध्द असून त्याला ऐतिहासिक वारसा आहे. संस्थान काळात तर हा दसरा राजेशाही थाटात.. मोठ्या दिमाखात साजरा होत होता. कोल्हापूरचा हा दसरा महोत्सव देश विदेशात पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासनासह राज्य शासन प्रयत्नशील आहे. यावर्षी दसऱ्या दिवशी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते पारंपरिक पध्दतीने होणाऱ्या सीमोल्लंघनाबरोबरच राजेशाही परंपरा कायम ठेवत भव्यदिव्य पध्दतीने शाही दसरा साजरा होणार आहे. जुना राजवाडा ते दसरा चौक दरम्यान छबीना, लवाजमा, पारंपरिक वाद्य, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, राजेशाही पोषाखातील राज घराण्यातील वंशज व पारंपरिक वेशभुषा अशा दिमाखात नागरिकांच्या सहभागाने दसरा महोत्सव साजरा होणार आहे. यावर्षी दिनांक 15 ते 24 ऑक्टोबर 2023 दरम्यान विविध उपक्रम, स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होवून आपणही या ऐतिहासिक शाही दसरा महोत्सवाचे साक्षीदार होवूया… !
सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी- महोत्सवात 17 ते 21 ऑक्टोबर दरम्यान दसरा चौकातील रंगमंचावर सायंकाळी 6.30 ते 9 यावेळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. मंगळवार 17 ऑक्टोबर रोजी मराठी संस्कृती आणि सण-वारांवर आधारित नृत्य संगीताचा आविष्कार असणारा ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा 80 कलाकारांचा सहभाग असलेला सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. बुधवार 18 ऑक्टोबर रोजी राजेश देशपांडे दिग्दर्शित व भाऊ कदम, ओंकार भोजने अभिनित ‘करुन गेलो गाव’ हे नाटक तर गुरुवार 19 ऑक्टोबरला दादा कोंडके यांच्यावर आधारित कलाविष्कार कार्यक्रम सादर केला जाणार आहे. यात ‘चला हवा येवू द्या’ फेम प्रख्यात कलाकार भारत गणेशपुरे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे व अन्य 35 कलाकारांचा सहभाग असेल. तसेच लहान मुलांकडून प्रचंड प्रतिसाद मिळालेले ‘अलबत्या गलबत्या’ हे नाटक शुक्रवार 20 ऑक्टोबरला सादर होणार आहे. नवरात्र म्हणजे देवीचा जागर घालणारा उत्सव.. याचसाठी शनिवार 21 ऑक्टोबर रोजी सिनेतारकांचा ‘नवदुर्गा.. नवतारका’ हा संगीत व नृत्य- नाट्य कार्यक्रम होणार आहे. यात दूरचित्रवाणीवरील बहुतांशी अभिनेत्री सहभागी होणार आहेत.. आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...
रचना शिल्प प्रात्यक्षिकासह अनुभवायला मिळणार मजा..- 22 ते 24 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत महावीर कॉलेज ते खानविलकर पेट्रोल पंप मार्गावर रचना शिल्प प्रात्यक्षिक व स्पर्धा होणार आहे. रविवार 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते 11 यावेळेत दसरा चौक ते जयंती पुल रस्ता हा फन स्ट्रीटवर जुने खेळ, आट्या पाट्या, गलोर, गोट्या, भोवरा, गाणी, चित्र, मार्शल आर्ट, मर्दानी खेळ, गो कारटिंग, महिलांसाठी लेझीम आदी मजा अनुभवायला मिळेल. रविवार 22 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 7 या वेळेत महाव्दार रोडवर गालिचा रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
***करवीरच्या लेकीचा होणार सन्मान- राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर कर्तृत्ववान ठरलेल्या कोल्हापुरच्या लेकीचा (महिलेचा) गौरव होणारा ‘करवीर तारा सन्मान’ कार्यक्रम सोमवार 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात होणार आहे.
|
चला..! कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवाचे साक्षीदार होवूया..!
पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.


















































































