काेल्हापुरात भरणार रानभाज्या उत्सव..एनजीओ कपेंशन २४ कोल्हापूर दुई केअर आणि निसर्ग अंकुर यांचे नियाेजन

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
एनजीओ कपेंशन २४ कोल्हापूर दुई केअर आणि निसर्ग अंकुर ह्यांच्या वतीने २ आणि ३ ऑक्टोंबर रोजी रानभाज्या उत्सव
कोल्हापूर : सह्याद्री डोंगररांगा, कोकण आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत दुर्गम भागात. जंगलात संपूर्णतः नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या आणि सहजगत्या उपलब्ध होणाऱ्या आरोग्यकारी पौष्टिक व औषधी अशा या रानभाज्यांची ओळख सर्वांना होऊन निसर्गप्रेमींनी त्या आपल्या परसबागेत लावून त्यांचे फायदे मिळावेत ह्या दृष्टीने एनजीओ कंपॅशन २४, कोल्हापूर वुई केअर आणि निसर्ग अंकुर ह्यांच्या तर्फे महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून जवळपास १५० हून अधिक अश्या ह्या रानभाज्यांचे माहितीपूर्ण प्रदर्शन येत्या २ आणि ३ ऑक्टोबर २०२३ रोजी जैन बोर्डिंग, दसरा चौक येथे सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती एनजीओ कपेंशन २४, कोल्हापूर वुई केअरचे अध्यक्ष मिलिंद धोंड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ह्या प्रदर्शनाचे उदघाटन २ तारखेला सकाळी दहा वाजता प्रमुख पाहुणे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के,कोल्हापूर वनविभागाचे IFS उप वनसंरक्षक गुरू प्रसाद तसेच वैज्ञानिक आणि लेखकनिसर्ग अंकुरचे अध्यक्ष डॉ.मधुकर बाचूळकर ह्यांच्या हस्ते होणार असून अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, गडहिंग्लजचे प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, आणि करवीर तालुका कृषी अधिकारी, बंडा कुंभार हे मान्यवर प्रदर्शनाला खास भेट देतील. निसर्ग जैव विविधतेने समृद्ध आहे. पुरातन काळापासून अनेक रानभाज्या आवडीने शिजविल्या व खाल्ल्या जातात.
  • निसर्गात अत्यंत दुर्मिळ असणान्या गारंबी किंवा गर्दळीची ४ फुटी शेंग, टेटू ची तलवारीसारखी २ फुटी शेंग, खाजकुहीली चे वेल, शेरणी, चन्त्रीचे वेल, सोनार वेल कांड्याचित्रक, गाजरीची भाजी, खरशिंग शेंगा, कडवी अमरकंद, नळीची भाजी. समुद्रशोक अशा कधीही सहज न बघायला मिळणाऱ्या रानभाज्या आपल्याला इथे बघता येतील.

रुकाळू (वृक्षविर उगवणारा अळू), तीनतोंडी मांजरी / उदराचे कान खरशिंगी (चारफुटी शेंगा) सफेद मुसळी, कडवी अशा अत्यंत दुर्मिळ असणान्या रानभाज्या तसेच करटोली, दिडा, कुडा, आंबुशी, पाथरी, कुरडू, शेवगा बांबू कोंब, आंबट चुका, चाकवत, केना, पानांचा ओवा, कपाळफोडी, चिवळ. आघाडा, काटमाट, घोळभाजी. अंबाडी, सुरण, टाकळा, मटारू, भुई आवळा, भारंगी ह्या औषधी गुणांनी युक्त आरोग्यवर्धक असलेल्या अनेक रानभाज्या आपल्याला ह्या प्रदर्शनात बघता येतील.

  • लोकांना ह्या रानभाज्यांची ओळख आणि चांगली माहिती मिळावी म्हणून मोहन माने, कोल्हापूर यांच्या परिश्रमातून रानभाज्यांचे हे माहितीपूर्ण प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. अथक प्रयत्नांनी अनेक रानभाज्यांची बियाणे व तरु वापरून रोपे तयार करण्यात आली आहेत. आणि रोपांच्या मार्फत ह्या रानभाज्या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.
ह्या प्रदर्शनात मार्गदर्शन आणि सहकार्य मिळतेय ती रानभाज्यांची ओळख, संवर्धन व संरक्षण याकरिता सन २०१० पासून विविध कृतीशील उपक्रम राबविणाऱ्या डॉ. मधुकर बाचूळकर ह्यांच्या “निसर्ग अंकुर ह्या संस्थेची. ह्या संस्थेतर्फे छायाचित्रांसह माहितीपूर्ण प्रदर्शन, मार्गदर्शक पुस्तक निर्मिती, रानभाज्या पाककृती प्रात्यक्षिके व स्पर्धा तसेच रानभाज्या खाद्यमहोत्सव याचे सातत्याने आयोजन करण्यात येते याबरोबरच संस्थेतर्फे दरवर्षी रानभाज्या शोधमोहीम राबविण्यात येते व विविध प्रदेशात वापरात असलेल्या रानभाज्यांची माहिती संकलित करण्यात येते.ह्या अनोख्या रानभाज्यांची चव चाखता यावेत म्हणून खाद्यपदार्थांचे स्टॉल्स ठेवण्यात येणार असून ह्या रानभाज्या आणि त्यांची रोपे प्रदर्शनस्थळी विक्रीसाठी उपलब्ध असतील तसेच  लघुतृणधान्य ( मिलेट्स) चे प्रदर्शन देखिल असणार आहे.
ह्या वेळच्या प्रदर्शनाचे खास आकर्षण म्हणजे ३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता प्रदर्शनस्थळी ५० रानभाज्या बनवण्याचे प्रात्यक्षिक आणि खास महिलांसाठी भरवण्यात येणारी रानभाज्याची पाककृती स्पर्धा (ग्रामीण व शहरी विभाग) आणि त्या सोबत रोख पारितोषिक / सर्टिफिकेट जिंकण्याची संधी मिळणार आहे. याकरिता 9766456789 क्रमांकावर संपर्क साधून स्पर्धेत सहभागी व्हा. असे आवाहन यावेळी करण्यात आले. पत्रकार परिषदेस मंजिरी कपडेकर, अमृता वासुदेवन, सुशांत टक्कळकी, मधुकर बाचुळकर,डॉ. अशोक वाली, मधुरा हावळ, अनिल वेल्हाळ, सुशील रायगांधी, अभिजित पाटील आदी उपस्थित होते.
”आता जमाना डिजीटल मिडीयाचा… वेगाने वाढणारी प्रचार व प्रसार यंत्रणा.. जिथे जिथे इंटरनेट.. तिथे तिथे माेबाईल आणि डिजीटल मिडीया साथ साथ!”
WWW.POSITIVEWATCH.IN 
एक सकारत्मक विचार

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.