बिद्री कारखानाः नफा तितकाच तोटा दाखवून लुट – प्रकाश आबिटकर; काय घडलय वाचा सविस्तर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

विनायक जितकर

सभासदांना वाढीव 500 रुपये दर देण्याच्या मुद्यावर उद्याच्या निवडणुकीला सामोरे…

बिद्री – अर्जुनवाडा (ता. राधानगरी) येथे दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना बिद्री निवडणूक पार्श्वभूमीवर गट क्रमांक 2 मधील शेतकरी सभासद, महिला व कार्यकर्ता मेळाव्याचे आज आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले सभासदांना वाढीव 500 रुपये दर देण्याच्या मुद्यावर उद्याच्या निवडणुकीला सामोरे जायचे आहे.

आमदार आबिटकर म्हणाले, ऊसाचा दर सोडून इतर बाय प्रोडक्ट्स मधील फायदा सभासदांना दिला पाहिजे व वाढीव 500 रुपये दर देण्याची जबाबदारी घेऊन उद्याची निवडणून लढायची आहे. या सगळ्या गोष्टींचा विश्वास घेऊन सभासदांच्या समोर जायचे आहे. व ही निवडून जिंकायची आहे असे त्यांनी बोलताना सांगितले. चुकीच्या पद्धतीने कारभार करणाऱ्यांना जाब विचारला पाहिजे. आपल्या सर्वांसाठी बिद्री साखर कारखाना आदर्शवत पाहिजे सभासदांचे अर्थकारण बिद्री कारखाना आहे. सभासदांच्या हितासाठी बिद्रीत सत्ता असणे महत्वाचे आहे. असे बोलताना त्यांनी सांगितले.

यावेळी मारुतीराव जाधव (गुरुजी) बोलताना म्हणाले, बिद्रीचा ऊसाचा दर एफ आर. पी. प्रमाणे दिला आहे. हा दर आमच्या हक्काचा आहे. इतर कारखान्यात एफ. आर. पी. पेक्षा जादा दर दिला गेला. पण राज्यात लय भारी म्हणणाऱ्या कारखाण्याने मात्र एक रुपया देखील जादा दिला नाही. बिद्री कारखान्याला को-जन मधून 96 कोटींचा नफा झाला तो नफा गेला कुठे याचा हिशोब  संचालक मंडळाने द्यावा. चुकीच्या कारभाराचे पुरावे दाखवत जाधव गुरुजींनी बिद्री कारखान्यातील कोट्यावधी रुपयांचा घोटाळा उघड करत विविध मुद्यावर त्यांनी भाष्य केले.

मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानी आमदार आबिटकर होते. स्वागत विजय बलुगडे यांनी केले. आभार रवी पाटील यांनी मानले. यावेळी माजी पंचायत समिती उपसभापती अरुण जाधव, के. जी. नांदेकर, नंदकिशोर सूर्यवंशी, बाबा नांदेकर, अशोक फराकटे, वंदना जाधव, दत्तात्रय उगले, शामराव भावके, कल्याणराव निकम, बालाजी फराकटे, शहाजी पाटील, सचिन वारके, संग्रामसिंह सावंत, अशोक वारके, संदीप वरंडेकर यांच्यासह गट क्रमांक दोन मधील शेतकरी सभासद, महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.