चंद्रयान थीम आणि ब्रम्हांड सेट… श्री गणेश मूर्ती विराजमान…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

यश इंग्लिश अकॅडमी सीबीएसई शाळा धामणवणे चिपळूण येथे बाप्पाचे आगमन…

चिपळूण – चंद्रयान थीम आणि ब्रम्हांड सेट करून श्री गणेश मूर्ती विराजमान यश इंग्लिश अकॅडमी सीबीएसई शाळा धामणवणे चिपळूण येथे आज मोठ्या उत्साहात श्री गणपती बाप्पाचे आगमन झाले. ढोल ताशा आणि लेझीम च्या तालासुरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. छोट्या छोट्या मुलांनी पुष्प पाकळ्या चा वर्षाव केला. आणि माझ्या पप्पा ने गणपती आणला या गाण्यावर नृत्य केले.

विधिवत पूजा करून आरती चा आनंद ही घेतला. चंद्रयान च्या प्रतिकृती चा आनंद घेतला. प्रतिकृती बनवत असताना विद्यार्थ्यांना विशेष माहिती यासंदर्भात देण्यात आली आणि त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यात आला. शाळा हे ही एक घर असते अन् सर्व सण उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करून एकात्मता निर्माण करणे हे ही एक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी असे उपक्रम राबविले जातात.

प्राचार्या सौ. राधा म्हाडदळकर तसेच संस्था चेअरमन श्री संतोष परांजपे यांनी मुलांच्या सोबत आरती केली. याचा आनंद सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी घेतला आणि सर्वांना सुखात ठेव रे महाराजा अशी आरज घातली.

आपल्या सेवेसाठी POSITIVVE WATCH MEDIA TEAM सज्ज

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.