सर्फनाला प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांना भरपाईपोटी 42 कोटी 90 लाख रुपये मंजूर – आमदार प्रकाश आबिटकर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

विनायक जितकर

प्रकल्पग्रस्तांना भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करण्यासाठी भरपाईपोटी निधी मंजूर…

आजरा प्रतिनिधी – आजरा तालुक्याच्या हरीतक्रांतीला वरदायी ठरणाऱ्या सर्फनाला प्रकल्पामधील प्रकल्पग्रस्तांना भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करण्यासाठी भरपाईपोटी 42 कोटी 90 लाखरुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, गेल्या 15 ते 20 वर्षापासून सर्फनाला प्रकल्पाचे काम निधी व पुनर्वसनाअभावी रखडलेले होता. याकरीता प्रकल्प ग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याकरीता शासन स्तरावर वेळोवेळी बैठका व पाठपुरावा करून प्रकल्प ग्रस्तांचा विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावले आहेत. सर्फनाला मध्यम प्रकल्पाकरीता भूमिसंपादन व पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 अल्पसे एस. आर. क्र. 2/2022 मौजे पारपोली, ता. आजरा येथील क्षेत्र 29202.95 चौ.मी. उपविभागीय अधिकारी आजरा – भुदरगड यांचेकडे भूसंपादन करणेकामी प्रस्ताव चालू आहे. या प्रस्तावाकरीता भरपाई रक्कम मिळणे गरजेचे होते त्याकरीता करण्यात आलेल्या पाठपुराव्यास यश आले असून सदर प्रस्तावाची निवाडयाची अंदाजीत रक्कम 42 कोटी 90 लाख रुपये मंजूर करण्यात आले असल्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी सांगितले आहे.

यामुळे सर्फनाला प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रमुख अडचण असणाऱ्या भुसंपादनाचा प्रश्न सुटणार असून सर्फनाला प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यास मदत होणार असल्याचे आमदार आबिटकर यांनी सांगितले आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.