गटस्तरीय कथाकथन स्पर्धेत प्रबुद्ध लोकरे प्रथम…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

प्रबुद्ध लोकरे याचा सत्कार करताना मुख्याध्यापिका मनीषा पाटील, वर्गशिक्षका अनिता पाटील, रोहिणी आबेगावकर, सहाय्यक शिक्षक भगवान झाडे, निशा परुळे…

कोल्हापूर – श्री सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक शाळा शेडगेवाडी येथे झालेल्या पहिली दुसरी गटस्तरीय बौद्धिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. बौद्धिक स्पर्धांतर्गत कथाकथन या स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.

गटस्तरीय कथाकथन स्पर्धेत इयत्ता पहिलीचा विद्यार्थी कुमार प्रबुद्ध जितेंद्र लोकरे याने दुष्काळावर आधारित चंकुबा कथा सादर करून उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आणले. यावेळी इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी आरोही सागर रोकडे हिने द्वितीय क्रमांक पटकावला तर इयत्ता पहिलीचा विद्यार्थी राजवीर सुशीलकुमार पाटील याने तृतीय क्रमांक पटकावला. यावेळी परीक्षक सचिन काळे व परीक्षक अर्चना पाटील यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.

विजयी स्पर्धकांना मुख्याध्यापिका मनीषा पाटील यांचे प्रोत्साहन लाभले . वर्गशिक्षक अनिता पाटील व रोहिणी आबेगावकर यांचे मार्गदर्शन लाभले .यावेळी भगवान झाडे , निशा परुले, रेखा पाटील,बबन दळवी , शशिकला कांबळे, अपूर्वा कांबळे, सुभाष मुंडे, राकेश गवळी आदी शिक्षक मान्यवर उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.