विनायक जितकर
शहरातील अनेक ठिकाणी शुकशुकाट… दसरा चौकात सकल मराठा समाजाची जोरदार घोषणाबाजी…
कोल्हापूर – जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाटी मार आणि गोळीबाराच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्या वतीने कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे. सकाळी सात वाजल्यापासूनच शहरातील अनेक ठिकाणी शिक्षकात जाणवत होता व्यापाऱ्यांनीही या बंदमध्ये सहभाग घेतल्याने लक्ष्मीपुरी व्यापारी पेठेत स्मशान शांतता जाणवत होती.
![]() |
![]() |
अत्यावश्यक सेवा वगळून हा कोल्हापूर बंद पुकारण्यात आला होता. अनेक रस्त्यांवर शिक्षकांत जाणवत असून शहराच्या विविध भागांमध्ये मराठा समाजा वतीने मोटरसायकल रॅली कडून बंदच आवाहन देखील करण्यात आले होते. शहरातील ऐतिहासिक दसरा चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने सध्या राज्य सरकार विरोधात सामान्य जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान कोल्हापूर बंदच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरामध्ये प्रत्येक चौकात मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला होता. शहरातील व्यापारी दुकानदार आणि व्यावसायिकांनी आपली सर्व व्यवहारे बंद ठेवून सकल मराठा समाजाच्या कोल्हापूर बंदला प्रतिसाद दिल्याचे चित्र कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतय. या आंदोलनात मराठा समाजाचा चांगला प्रतिसाद मिळाला.
दसरा चौकातील आंदोलनात मराठा समाजाकडून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी वसंतराव मुळीक, जिल्हाप्रमुख संजय पवार, जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, आर. के. पवार, बाबा पार्टे, एडवोकेट बाबा इंदुलकर, दिलीप किशोर, किशोर घाडगे, शैलजाताई साळोखे, महादेव पाटील, गिरीश फोंडे, आर डी पाटील, राजू जाधव यांच्यासह सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.