सकल मराठा समाजाकडून उद्या कोल्हापूर बंदची हाक…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

विनायक जितकर

जालना येथील मराठा समाजावर लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर बंदचा निर्णय… कोल्हापूरवासियांनी शांततेत बंद पाळण्याचं केलं आवाहन…

कोल्हापूर – जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथं मराठा आरक्षणाच्या मागणी बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठी आल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीने कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे. आज ऐतिहासिक दसरा चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने जवाब दो आंदोलन करण्यात आलं यावेळी कोल्हापूर बंदची घोषणा करण्यात आली आहे.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथं मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून उपोषण सुरू आहे या उपोषणादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर अमानुष लाठी हल्ला केला याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला आहे आज कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौकात या लाटे हल्ल्याचा निषेध करत जवाब दो आंदोलन करण्यात आलं या आंदोलनावेळी राज्य सरकार विरोधात आणि लाठी हल्ला करण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी बोलताना सकल मराठा समाजाचे समन्वयक वसंतराव मुळीक यांनी या लाटी हल्ल्याचा निषेध म्हणून उद्या मंगळवारी कोल्हापूर शहर बंदची हाक दिली. त्याचबरोबर उद्या होणाऱ्या तलाठी परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना कोल्हापूर बंदचा कोणताही फटका बसणार नाही याची दक्षता घेणार असल्याचेही वसंतराव मुळीक यांनी सांगितलं.

यावेळी या आंदोलनात आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाप्रमुख संजय पवार, जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, बाबा पार्टे, एडवोकेट बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, किशोर घाडगे, शैलजाताई साळुंखे, शशिकांत पाटील, महादेव पाटील, गिरीश फोंडे, आर डी पाटील, शारंगधर देशमुख, राजू जाधव यांच्यासह सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.