विनायक जितकर
बिद्रीत सत्ता दिल्यास शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा प्रतिटन ५०० रुपये जादा दर देण्यासाठी आम्ही कटिबद्ध…
सरवडे – नरतवडे (ता. राधानगरी) येथे बिद्री साखर कारखाना निवडणूक पार्श्वभूमीवर गट क्रमांक एक मधील सभासद व कार्यकर्ते मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना आमदार प्रकाश आबिटकर यांनी बिद्रीतील संचालक मंडळाचा भ्रष्ट कारभार व त्यांच्या चुकीच्या कारभाराला पाठीशी घालणारे ऑडीटर यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेच लागतील असा इशारा त्यांनी दिला.
![]() |
![]() |
आमदार आबिटकर म्हणाले, बिद्रीच्या सहवीज प्रकल्पामुळे प्रत्येक वर्षी एफआरपीपेक्षा वाढीव दर मिळणे अपेक्षित होते. पण या रक्कमेतून मिळालेले उत्पन्न सभासदांना न देता नफ्याएवढाच तोटा दाखवून लाटले आहे. शेतकऱ्यांच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या लै भारीचा भुलभुलैया आम्ही वास्तव रुपात सभासदांसमोर आणणार आहोत. सभासदांनी वास्तवता जाणून घामाचे दाम पदरात पाडून घेण्यासाठी बिद्रीत परिवर्तन करावे. आमच्या हाती सत्ता दिल्यास शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा प्रतिटन ५०० रुपये जादा दर देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू.
अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते रंगराव मगदूम होते. डी. पी. पाटील यांनी स्वागत केले. मेळाव्यास के. जी. नांदेकर, प्रा. अर्जुन आबिटकर, अरुण जाधव, दत्तात्रय उगले, सुभाष पाटील, नंदकुमार ढेंगे, सूर्याजी देसाई, संजय पाटील, राजेश मोरे, बाबुराव लाड, कल्याण निकम, ए. बी. पाटील, विजय बलुगडे, विलास डवर, सचिन वारके, विश्वनाथ पाटील, अरविंद पाटील यांच्यासह गट क्रमांक एक मधील सभासद, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















































