गणेश उत्सव 2023 च्या अनुषंगाने शहर अभियंता यांना सूचना…
कोल्हापूर – गणेश उत्सव 2023 च्या अनुषंगाने शहरातील रस्त्यांचे पॅचवर्कची कामे गणेश उत्सवापुर्वी पुर्ण करण्याच्या सूचना प्रशासक के मंजूलक्ष्मी यांनी शहर अभियंता यांना दिल्या. आयुक्त कार्यालयात गणेश उत्सवाच्या पुर्व तयारीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये शहर अभियंता यांनी चारही विभागीय कार्यालया अंतर्गत पॅचवर्कच्या कामाचे नियोजन करण्यात आले असून लवकरच पॅचवर्कच्या कामाला सुरवात करणार असलेचे शहर अभियंता यांनी सांगितले. घरगुती व सार्वजनिक गणपती ठिकठिकाणी ठेवलेल्या कुंडापासून इराणी खणीपर्यंत नेण्यासाठी 257 टॅम्पो व 10 ट्रॅक्टरची प्रत्येकी 2 प्रमाणे 514 हमालासह व्यवस्था करण्यात आली असलेचे सहा.अभियंता यांत्रिकी यांनी सांगितले.
![]() |
![]() |
प्रशासक के मंजूलक्ष्मी यांनी गणेश उत्सवाच्या अनुषंगाने ज्या काही निविदा प्रक्रिया करावयाच्या आहेत त्या तातडीने पुर्ण करण्याच्या सुचना सर्व संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या. श्री गणेश आगमन, मिरवणूक मार्ग व विर्सजन ठिकाणी लाईट बंद असलेस ती तातडीने सुरु करण्याच्या सूचना दिल्या. ज्या ज्या ठिकाणी मंडप व बॅराकेटींगची आवश्यकता आहे त्या ठिकाणी वार्षिक ठेकेदारामार्फत काम करुन घेण्याच्या सूचना दिल्या. विभागीय कार्यालय व आरोग्य स्वच्छता विभाग यांनी विशेष स्वच्छता मोहिम राबवून खरमाती व कचरा उठाव करावा. रस्त्यावरील मांडव घालण्यास परवानगी देताना वाहतूकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्या. यासाठी गणेश उत्सवापुर्वी विशेष मोहिम राबवावी. मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी विर्सजनाचे नेटके नियोजन करण्याच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, केशव जाधव, उप-आयुक्त साधना पाटील, शिल्पा दरेकर, सहा.आयुक्त संजय सरनाईक, डॉ. विजय पाटील, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, जल अभियंता नेत्रदिप सरनोबत, आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा, प्रशासन अधिकारी एस के यादव, उपशहर अभियंता नारायण भोसले, एन. एस. पाटील, सतीश फप्पे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, सहा.अभियंता यांत्रिकी चेतन शिंदे, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, सहा.अभियंता विद्युत चेतन लायकर उपस्थित होते.

















































