समरजीत घाटगे धावले…सुरू होती पोलीस तयारी! कोण होते ही तरुणाई;वाचा सविस्तर…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

अरविंद सावरतकर

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरूणांसोबत जॉगिंग…

कोल्हापूर – राजकीय नेत्यांबाबत तरूणाईमध्ये आकर्षण असते. नेहमीच लोकांच्या गराड्यात असलेल्या नेत्यांशी राजकारणाशिवाय ही इतरही विषयांवर निवांत चर्चा करण्याची संधी मिळणं दुर्मिळ असतं. मात्र कोल्हापूरमधील पोलीस भरती सराव करणाऱ्या तरूणांना मात्र जिल्ह्यातील राजकारणी, शाहू ग्रुपचे प्रमुख समरजीत घाटगे यांच्या सोबत जॉगिंग करायची संधी मिळाली.

समरजीत घाटगे यांच्या सोबत निवांत गप्पा मारून तरुणही खुश झाले. शाहू ग्रुपचे प्रमुख समरजीत घाटगे हे सकाळी दररोज व्यायाम करतात. यासाठी ते शहरातील वेगवेगळ्या मैदानावर जात असतात. गुरुवारी ते मेरी वेदर मैदानावर व्यायामासाठी गेले होते. यावेळी पोलीस भरतीसाठी सराव करणारे काही तरुण त्यांना भेटले. या तरुणांनी समरजीत यांच्यासोबत सेल्फी काढले.

त्यानंतर गप्पा रंगल्या तरुण काय आणि कसे व्यायाम करतात याची माहिती त्यांनी घेतली. कोण कोणत्या गावचा आहे? शिक्षण काय आहे? अशा गप्पा झाल्यानंतर समरजीत यांनी त्यांच्या सोबत जॉगिंग केले. व्यायामही केला. यामुळे तरुणही खुश झाले. यातला संदीप पाटील हा तरुण सांगतो, “आम्ही आतापर्यंत वर्तमानपत्रातल्या बातम्यामधून समरजीतराजे यांना बघत होतो, आज प्रत्यक्ष भेटलो. आम्ही त्यांच्या मतदारसंघातील नसताना देखील आम्हाला वेळ दिला.”त्याबद्दल आभार व्यक्त केले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.