पुरामुळे बाधित दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी – चेतन नरके

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

विनायक जितकर

पुराचा सर्वाधिक फटका दुध उत्पादक शेतकऱ्यांना…

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. पुराचा सर्वाधिक फटका दुध उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. एकट्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) दूध संकलन गेल्या आठ दिवसात ५० हजार लिटरने घटले आहे. सर्व पूर बाधित दूध उत्पादन शेतकऱ्यांना सरकारने तातडीची आर्थिक मदत द्यावी. अशी मागणी गोकुळ चे संचालक डॉ. चेतन नरके यांनी निवेदनाद्वारे महसूल, दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री,राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या कडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की,कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दहा-बारा दिवसांपासून धुवादार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ‘पंचगंगा’, ‘कुंभी’, ‘कासारी’, ‘दूधगंगा’, ‘वेदगंगा’ या प्रमुख नद्यांसह छोट्या मोठ्या नद्या व ओढ्यांचे पाणी रस्त्यांवर आल्याने वहातूक ठप्प आहे. नदीकाठावरील ऊस, भातासह इतर पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी कमालीचा हवालदिल झाला आहे. त्यातच वहातूक ठप्प असल्याने अनेक गावांतील दूध संकलनही थांबले आहे. एकट्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) दूध संकलन गेल्या आठ दिवसात ५० हजार लिटरने घटले आहे.

तीच अवस्था ‘वारणा’सह इतर छोट्या छोट्या दूध संघाची आहे. गेल्या आठ दिवसात जवळपास ७५ हजार लिटर दूध शेतक-यांच्या घरीच राहिले आहे. एकीकडे पुराच्या पाण्यात पिके कुजत असताना दुसऱ्या बाजूला दहा दिवसाला ज्या पैशावर संसाराचा गाडा चालवला जातो, ते दूधच घरी राहिल्याने दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. या संकटातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना सावरण्यासाठी राज्य शासनाने त्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी डॉ. चेतन नरके यांनी केली आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.