एनसीसी दिनानिमित्त २०० कॅडेट्सचा प्लास्टिकमुक्त परिसर अभियानात सहभाग
कोल्हापूर WATCH TEAM: एनसीसी दिनाचे औचित्य साधून प्लास्टिकमुक्त परिसर आणि स्वच्छतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण के.एम.सी. कॉलेज, जी.के.जी. कॉलेज आणि ५६ महाराष्ट्र बटालियन एनसीसी यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिकमुक्त परिसर अभियान उत्साहात राबविण्यात आले. शाहू दयानंद हायस्कूल परिसरात आयोजित या अभियानाला एनसीसी कॅडेट्सचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
ही बातमीही अधिक वाचली. NCC-शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक मार्गाचा शाेध घेणार १०५० कँडेटस्
या उपक्रमामध्ये यशवंतराव चव्हाण के.एम.सी. कॉलेज, जी.के.जी. कॉलेज, शाहू दयानंद हायस्कूल, इंदिरा गांधी स्कूल आणि जय हनुमान हायस्कूल, इस्पुर्ली येथील एकूण २०० एनसीसी कॅडेट्स तसेच पाच एनसीसी अधिकारी सहभागी झाले होते. कॅडेट्सनी संपूर्ण मैदान व परिसराची स्वच्छता करून ठिकठिकाणी पडलेले प्लास्टिक कचरा गोळा केला. संकलित प्लास्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन व विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात आली. या मोहिमेमुळे संपूर्ण परिसर प्लास्टिकमुक्त व स्वच्छ करण्यात आला.
‘स्वच्छ परिसर, सुंदर परिसर आणि प्लास्टिकमुक्त पर्यावरण’ हा संदेश देणाऱ्या या उपक्रमातून एनसीसी कॅडेट्सनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. केवळ स्वच्छतेपुरते मर्यादित न राहता प्लास्टिकचा वापर टाळणे, पर्यावरणाचे संवर्धन करणे आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता.
ही बातमीही अधिक वाचली. देशभरातील NCC कॅडेट्स अनुभवणार पन्हाळा ते विशाळगड ट्रेकींगचा थरार–शिवाजी ट्रेलट्रेक 2023 मोहिमेला प्रारंभ
या उपक्रमाला कोल्हापूर महानगरपालिकेचे उपायुक्त किरण कुमार धनवाडे, ५६ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल निखिल सक्सेना, प्राचार्य पी. पी. नागावकर आणि प्राचार्य आर. बी. भुयेकर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे नियोजन कॅप्टन डॉ. अमित रेडेकर, लेफ्टनंट डॉ. डी. के. नरळे, ऑफिसर अजित कारंडे, ऑफिसर संग्राम सोनार आणि ऑफिसर राजाराम चौगुले यांनी केले. एनसीसीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव आणि पर्यावरण संवर्धनाची भावना रुजविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.विद्यार्थ्यांनी केवळ स्वच्छतेचा संदेश दिला नाही, तर स्वतः पुढाकार घेऊन कृतीतून तो समाजासमोर ठेवला. विद्यार्थ्यांनी केवळ स्वच्छतेचा संदेश दिला नाही, तर स्वतः पुढाकार घेऊन कृतीतून तो समाजासमोर ठेवला.
ही बातमीही अधिक वाचली….NCC CAMP: पन्हाळा ते विशाळगड ची शिवाजी ट्रेल ट्रेकची यशस्वी माेहीम, सांस्कृतिक कार्यक्रमाने सांगता!




























