स्वदेशी डाईंग अँड ब्लिचिंग मिल व राष्ट्रीय प्राेसेसिंग कामगार संघटना यांच्यात वेतनवाढ करार

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
इचलकरंजी -TEAM WATCH
इचलकरंजीतील प्रक्रिया उद्याेगात अग्रणी असलेल्या स्वदेशी डाईंग अँड ब्लिचिंग मिल्स आणि राष्ट्रीय प्राेसेसिंग कामगार संघटना यांच्यात कामगारांच्या वेतनवाढीचा द्वैवार्षिक करार नुकताच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. या करारामुळे कारखान्यातील कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
व्यवस्थापन आणि युनियन यांच्यात झालेल्या यशस्वी वाटाघाटीनंतर या करारावर स्वाक्षèया करण्यात आल्या. वाढती महागाई लक्षात घेऊन कामगारांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी यासाठी युनियनने मांडलेल्या मागण्यांवर व्यवस्थापनाने सकारात्मक निर्णय घेतला.
अडचणीच्या काळातही स्वदेशी मिल्सच्या वतीने कामगारांना पगार वाढीचा करार करण्यात आल्याने संघटनेच्या वतीने श्रीनिवास बाेहरा यांचा जाॅईंट सेक्रेटरी राजेंद्र बचाटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी वेतनवाढीसाेबतच उत्पादन गुणवत्ता आणि शिस्त राखण्यासाठी कामगारांकडून सर्वताेपरी सहकार्य करण्याचे मान्य केले.
याप्रसंगी कंपनी राष्ट्रीय प्राेसेसिंग कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी भाेसले, उपाध्यक्ष प्रदीप साहू, जाॅईंट सेक्रेटरी राजेंद्र बचाटे, सेक्रेटरी विजयालक्ष्मी कुलकणी, खजिनदार नरसिंह पारीक, दत्तात्रय नलावडे, विठ्ठल रायमाने तसेच स्वदेशीचे मॅनेजर राधेश्याम शर्मा, लेबर ऑिफसर विलास कुलकर्णी आदींसह संघटनेचे पदाधिकारी, कामगार उपस्थित हाेते. कामगार आणि व्यवस्थापनातील परस्पर सहकार्यामुळेच हा ताेडगा सुकर झाल्याचे दाेन्ही बाजूंच्या प्रतिनिधींनी यावेळी नमूद केले.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.