चालक-कंडक्टरच्या चाणाक्ष नजरेमुळे एसटी बसमधील दारू वाहतूक उघड

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

चालक-कंडक्टरच्या चाणाक्ष नजरेमुळे एसटी बसमधील दारू वाहतूक उघड

कोल्हापूर : एसटी बसमधून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करण्याचा प्रयत्न चालक व वाहकाच्या चाणाक्ष नजरेमुळे आणि सतर्कतेमुळे उघडकीस आला. कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकात सुरक्षा व दक्षता शाखेने केलेल्या तपासणीत एका प्रवाशाकडून गोवा बनावटीच्या दारूच्या तब्बल १०० बाटल्या आढळून आल्या.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

पणजी–महाबळेश्वर मार्गावरील MH 14 MH 8402 या एसटी बसची कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकात तपासणी करण्यात आली. यावेळी पणजी ते कोल्हापूर प्रवास करणाऱ्या सावळा बिरा पांढरे (रा. पांढरेवाडी, ता. जत, जि. सांगली) यांच्या ताब्यातील पोत्याची तपासणी केली असता त्यामध्ये RUM XXX प्रकारच्या १८० मिली क्षमतेच्या १०० गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या.

चालक व वाहकांच्या सतर्कतेमुळे संशयास्पद हालचाली लक्षात आल्याने सुरक्षा यंत्रणेने अधिक दक्षतेने तपासणी केली. त्यानंतर संबंधित प्रवासी व दारूचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभाग, कोल्हापूर यांच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.

ही कारवाई एसटीच्या सुरक्षा व दक्षता शाखेचे अधिकारी व पर्यवेक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अतुल बंडगर यांच्या सहकार्याने करण्यात आली.

प्रवाशांची सुरक्षितता आणि एसटीच्या माध्यमातून होणाऱ्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी भविष्यातही अशा प्रकारच्या तपासण्या सुरू राहणार आहेत.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.