मिशन एड्स सुरक्षासाठी खाजगी डॉक्टर्सनी योगदान द्यावे – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

जिल्हा एड्स नियंत्रण समितीची त्रैमासिक सभा संपन्न

कोल्हापूर – देशातील एचआयव्ही संसर्गितांचे आकडेवारी आटोक्यात आणण्यासाठी मिशन एड्स सुरक्षा अभियान देशभर चालू आहे. एच.आय.व्ही. चे 95:95:99 हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न चालू असून जिल्ह्यातील खासगी डॉक्टर्सनी त्यांच्याजवळ एच.आय.व्ही. औषधोपचार घेत असणाऱ्या रुग्णांची सांख्यिकी माहिती शासनाला दिल्यास हे उद्दिष्ट साध्य होण्यासाठी मदत होणार असल्याने सर्व खाजगी डॉक्टर्सनी ही माहिती शासनास सादर करावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी केले.

जिल्हा एड्स नियंत्रण समितीची त्रैमासिक सभा जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.यावेळी CPR च्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रेश्मा पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर प्रामुख्याने उपस्थित होत्या. प्राथमिक आरोग्य केंद्रासह सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये गरोदर मातांची एच.आय.व्ही. तपासणी व्हायला हवी,एड्स नियंत्रणामध्ये काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचा आढावा घेण्यात यावा, जिल्ह्यातील नवीन एच.आय.व्ही. संसर्गितांची आकडेवारी घटलेली असून ही बाब अतिशय चांगली असल्याचे मत यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. मिशन एड्स सुरक्षा व इंडेक्स तपासणी अभियान प्रभावीपणे राबवावे त्याचबरोबर क्षयरोगाची तपासणी लवकरात लवकर केल्यास रुग्णाला त्याचा फायदा होणार असल्याने ही तपासणी करण्यावर भर देण्यात यावा अशी सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

तत्पूर्वी जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीमती दीपा शिपुरकर यांनी जिल्ह्यातील एड्स नियंत्रणाच्या कामाचा विस्तृत आढावा सांगून, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत नवीन एच.आय.व्ही. संसर्गितांची आकडेवारी आटोक्यात येत असल्याची सांगितले. या आढावा बैठकीसाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत रेवडेकर, डॉ. तेजल जाधव, क्षयरोग अधिकारी डॉ. रूपाली यादव,माहिती अधिकारी फारुख बागवान,सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नीता सूर्यवंशी-पाटील,क्लस्टर अधिकारी रमेश वर्धन, डॉ. ऋतुजा कदम, डॉ. वर्षा काळे, डॉ. सूर्यकांत खारगे, यांच्यासह अधिकारी कर्मचारी व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.