चांदोलीत गव्यांचा वाढता धोका; उखळू येथे भीषण धडक, तिघे जखमी वनविभागाच्या निष्क्रीयतेवर ग्रामस्थांचा संताप

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

वन्यजीव संरक्षण आणि मानवी सुरक्षितता यामध्ये समतोल राखणे अत्यावश्यक

बांबवडे (प्रतिनिधी) – चांदोली अभयारण्य परिसरात वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीकडे वाढता कल आता धोकादायक टप्प्यावर पोहोचला आहे. उखळू (ता. शाहूवाडी) येथे गव्याने मोटारसायकलला दिलेल्या जोरदार धडकेत दोन शाळकरी मुलांसह तिघे जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात संजय बाळू वडाम (४०) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांचा मुलगा आदर्श (११) व पुतण्या अनुज (१४) हे किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर कोल्हापूर येथील CPR रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.

अचानक समोर आला ‘गवा’, भीषण धडक

संजय वडाम हे मुलगा व पुतण्यासह मणदूर येथून काम आटोपून परतत असताना उखळूच्या मुख्य रस्त्यावर अचानक अभयारण्यातून आलेल्या गव्याने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात संजय वडाम रस्त्याच्या कडेला फेकले गेले असून त्यांच्या खुब्याला गंभीर दुखापत झाली. दोन्ही मुलांनाही या धडकेत मार बसला.

वेळेवर मदत नाही; ग्रामस्थांनीच घेतली धाव

अपघातानंतर ग्रामस्थांनी तातडीने जखमींना खाजगी वाहनातून शितूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने संजय वडाम यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरला हलवावे लागले. प्राथमिक उपचारानंतर मुलांना घरी सोडण्यात आले.

सहाव्या-सातव्या घटनेनंतरही प्रशासन झोपेत?

गेल्या महिनाभरात या परिसरात गव्याच्या हल्ल्यांच्या सहा ते सात घटना घडल्या आहेत. तरीही वनविभागाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. घटनास्थळी मदतीसाठी वनविभागाची यंत्रणा वेळेत न पोहोचल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.