म्हासरंग, उकीरभाटले व अनफ येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
गारगोटी प्रतिनिधी (विनायक जितकर) – कडगांव, ता. भुदरगड जिल्हा परिषद मतदार संघातील विकास कामांसाठी जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने विकास निधी देण्यासाठी कुठेही कमी पडलो नाही व यापुढे कमी पडणार नाही. या जिल्हा परिषद गटातील मतदार हा अत्यंत प्रामाणिक असून या विभागातील जनतेने मला पडत्या काळातही मनापासून साथ दिली आहे. या जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येण्यासाठी निवडणुकीत संघटितपणे काम करावे, असे आवाहन पालकमंत्री नाम.प्रकाश आबिटकर यांनी केले.
गारगोटी (ता.भुदरगड) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हासरंगचे माजी सरपंच दयानंद चव्हाण, उकीरभाटलेचे माजी उपसरपंच जयदीप साठे, सुनिल चव्हाण यांच्यासह प्रमुख मान्यवरांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. यानिमित्ताने आयोजित जाहीर कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी बोलताना बाबा नांदेकर म्हणाले की, जो नेता सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करतो त्यालाच जनतेचे प्रेम मिळते. नाम.आबिटकर साहेबांनी कडगांव जिल्हा परिषद मतदार संघातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावलेले आहेत. ज्या प्रमाणे देशात महायुती, राज्यात महायुती तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये देखील महायुतीचे सत्ता आणण्यासाठी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना मोठे मताधिक्य द्यावे, असे आवाहन केले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संग्रामसिंह सावंत, बाजार समितीचे संचालक संदीप वरंडेकर, आनंदा ढोकरे, सुजित चव्हाण, दत्तात्रय गोजारे, एकनाथ देवेकर, सुरेश शेटगे, पांडूरंग साठे, ग्रा.पं.सदस्या सुवर्णा चव्हाण, नहुनबी शेख, संजय कांबळे, संतोष चव्हाण, बाळा चव्हाण, मोहन पेडणेकर, जाबीर शेख, आनंदा चव्हाण, प्रकाश चव्हाण, उत्तम चव्हाण, दिनकर गुरव, शिवाजी मोरे, सुभाष दिवेकर, प्रकाश दिवेकर, मोहन चव्हाण, भरत चव्हाण, विलास गुरव, मच्छिंद्र डवरी, रवी राणे, नामदेव कांबळे, रामा मिस्री बळीराम कांबळे, दिपाली चव्हाण, काजल साठे प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















































