मतदार संघाचा विकास हेच आमचे व्हिजन – नाम. प्रकाश आबिटकर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

राशिवडे जि.प.उमेदवार अशोक पाटील, धामोड पं.स.उमेदवार केरबा पाटील यांना बळ द्या

धामोड प्रतिनिधी (विनायक जितकर) – राधानगरीतील जनतेने माझ्यावर विश्वास टाकून सलग तीन वेळा आमदारकीची संधी दिली. या संधीचे सोने केले. या जनतेसोबतची जुळलेली नाळ कधीच तुटणार नाही. जनतेच्या कायम ऋणात राहून मतदारसंघाचा विकास करणे हे माझे कर्तव्यच आहे. तुळशी – धामणी परिसरातील जनतेचे प्रेम आणि विश्वास हीच माझी ताकद असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनी केले. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेचे राशिवडे बुद्रुक जि. प. उमेदवार अशोक पाटील आणि धामोड पं. स. उमेदवार केरबा पाटील यांना बळ द्या असे आवाहन त्यांनी केले. धामोड येथिल प्रचारसभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एम. डी. गायकवाड होते.

यावेळी बोलताना नाम.आबिटकर म्हणाले की, जात-पात, गट-तट न मानता सर्वधर्म समभाव जपत सर्वांचेच प्रश्न सोडवले. जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचे मला भाग्य लाभले. जनतेच्या आपुलकी, प्रेम, जिव्हाळा आणि पाठिंब्याच्या जोरावर मतदारसंघात विकासगंगा प्रवाहित ठेवली आहे. यापुढेही मतदारसंघात विकासाचा झंझावात कायम सुरू राहील आणि विकासाच्या बाबतीत प्रत्येक गाव आदर्श करण्यासाठी आपल्या सर्वांना सोबत घेऊन सर्वांगीण प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तळागाळातील संघटन, कार्यकर्त्यांची निष्ठा आणि नेतृत्वावरचा विश्वास हीच शिवसेनेची खरी ताकद आहे, आणि त्याच बळावर आपण निश्चितच यश मिळवू, असा ठाम विश्वास शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील यांचेकडून यावेळी व्यक्त झाला.

यावेळी एकनाथ चौगले, सारिका पाटील, संजीवनी पाटील, मारुती गायकवाड, संजय ढोकरे, मच्छिन्द्र लाड, सचिन रणदिवे, शेखर तेली, पंकज पाटील, एकनाथ गुंडप,विनायक कोरे, सदाशिव कोरे, अशोक पाटील,अशोक सुतार, आनंदा धनवडे, किसन डबे, रामचंद्र नलवडे, एम. के. पाटील, एम डी फडके, यांचेसह तुळशी-धामणी परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते. स्वागत शेखर तेली, प्रास्ताविक के. एल. पाटील, सूत्रसंचलन आनंदा शिंदे यांनी केले तर आभार संभाजी पाटील यांनी मानले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.