भाजपाला साथ द्या – शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी भाजपचा ठाम पुढाकार – माधवराव घाटगे

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

चळवळ अधिक बळकट करण्यासाठी जनतेचे सहकार्य आवश्यक

अकिवाट प्रतिनिधी – सचिन मठपती – शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टीने ठोस पावले उचलली असून पिण्याचे पाणी, आरोग्य, दर्जेदार रस्ते, कृषी प्रगती तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या व्यक्तिगत लाभांच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प भाजपाने केला आहे. याच उद्देशाने उदगाव–आलास–यड्राव–दत्तवाडा जिल्हा परिषद मतदारसंघ आणि तालुका पंचायत समिती मतदारसंघात भाजपाने सक्षम उमेदवार उभे केले आहेत. या सर्व उमेदवारांना विजयी करून विकासाला साथ द्यावी, असे आवाहन गुरुदत्त शुगरचे चेअरमन व भाजपाचे प्रमुख माधवराव घाटगे यांनी केले. घाटगे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण क्षेत्रात प्रभावी धोरणे राबवली जात असून प्राथमिक शाळांमधील गुणवत्तापूर्ण व अधिक चांगले शिक्षण ग्रामीण भागात पोहोचत आहे. ही चळवळ अधिक बळकट करण्यासाठी जनतेचे सहकार्य आवश्यक आहे.

जिल्हा परिषद व तालुका पंचायत समितीच्या निवडणुकांत भाजपाचे उमेदवार पक्षाच्या चिन्हावर उभे असून राज्य व देशात भाजपाचे सरकार आहे. एकाच विचारसरणीचे प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांत सत्तेत आल्यास विकासाला वेग आणि दिशा मिळते, असा विश्वासही घाटगे यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, सामान्य कुटुंबातील तरुण-तरुणींना एकत्र आणून त्यांना मुख्य प्रवाहात सहभागी करून घेणे आणि सर्वांना सोबत घेऊन विकास करणे ही भाजपाची संकल्पना शिरोळ तालुक्यात रुजली आहे. या निवडणुकीत भाजपाच्या सर्व उमेदवारांना विजयी करून विकासाची गती वाढवावी, असे आवाहन त्यांनी केले.

दळणवळण –
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यातील कच्चे रस्ते पक्के करणे, पांदण रस्त्यांचे नूतनीकरण करणे आणि दळणवळणाच्या सर्व सुविधा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निधीतून विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. समान विचारांचे लोक स्थानिक संस्थांत असतील तर विकासाला चालना मिळते, असे घाटगे यांनी नमूद केले.

आरोग्य व व्यक्तिगत योजना –
प्राथमिक व ग्रामीण रुग्णालयांतील आरोग्ययंत्रणा अधिक गतिमान करून दर्जेदार उपचार उपलब्ध करून देण्यासाठी निवडून येणारे भाजपाचे प्रतिनिधी प्रयत्नशील राहतील. सरकारच्या अनेक व्यक्तिगत लाभांच्या योजना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे.

महापूर व कृषी –
महापूर नियंत्रणाच्या उपाययोजना आणि कृषी क्षेत्रातील सर्व योजना शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. राज्य सरकारने महापूर रोखण्यासाठी पावले उचलली असून कृषीविषयक सर्व योजना भाजप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवेल, असेही घाटगे यांनी स्पष्ट केले. विकासासाठी भाजपाला साथ द्या, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.