‘गोकुळ’ चा प्रतिदिन २० लाख लिटर दूध संकलनाचा ऐतिहासिक उच्चांक – नविद मुश्रीफ

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

दूध उत्पादकांचा विश्वास, सेवा-सुविधा व संघटित प्रयत्नांचे फलित

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) प्रतिदिन एकूण २० लाख लिटर दूध संकलनाचा ऐतिहासिक टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे. दि. ७ जून २०२१ रोजी संचालक मंडळाने गोकुळ प्रकल्प येथे प्रतिदिन २० लाख लिटर दूध संकलनाचा संकल्प केला होता. लाखो दूध उत्पादकांच्या सक्रीय सहभागामुळे तसेच संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नामुळे हा संकल्प आज पूर्णत्वास गेला असून, गोकुळच्या इतिहासातील हा आजवरचा सर्वाधिक दूध संकलनाचा उच्चांक ठरला आहे. आजचे एकूण दूध संकलन २० लाख ०५ हजार पैकी म्हैस दूध १०.७३ लाख लिटर व गाय दूध ९.३२ लाख लिटर इतके दूध संकलन झाले आहे.

याबाबत बोलताना गोकुळ दूध संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, “प्रतिदिन २० लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार होणे हे गोकुळ दूध संघाच्या सातत्यपूर्ण प्रगतीचे, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दृढ विश्वासाचे आणि उत्पादकाभिमुख, पारदर्शक कारभाराचे ठोस प्रतीक आहे.” गोकुळ दूध संघाने स्थापनेपासूनच दूध उत्पादकांना केंद्रस्थानी ठेवून कार्य केले आहे. दूध उत्पादकांच्या आर्थिक उन्नतीसाठी संघामार्फत जास्तीत जास्त दूध खरेदी दर, अंतिम दूध दर फरक, पशुवैद्यकीय सेवा, गुणवंतापूर्ण पशुखाद्य पुरवठा, जातिवंत म्हैस खरेदी अनुदान योजना तसेच विविध कल्याणकारी योजना, सेवा व सुविधा प्रभावीपणे राबविण्यात आल्या आहेत. यामुळे दूध उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या सेवा-सुविधांचा आणि पारदर्शक कारभाराचा थेट परिणाम म्हणून दूध उत्पादकांचा गोकुळ दूध संघावर असलेला विश्वास अधिक दृढ झाला आहे.

दूध उत्पादकांचा विश्वास हीच आमची खरी ताकद असून भविष्यात दूध उत्पादकांच्या सहकार्याने २५ लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा गाठण्याचा मानस आहे.” गेल्या चार वर्षांत आघाडीच्या सर्व नेतेमंडळींच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या सभासदहिताच्या विविध योजना, संचालक मंडळाचा काटकसरीचा व प्रभावी कारभार, सहकारी संचालकांचे बहुमोल सहकार्य तसेच दूध उत्पादक, दूध संस्था, ग्राहक, वितरक व कर्मचारी यांच्या योगदानामुळेच ‘गोकुळ’ची ही दिमाखदार वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.