विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा – पालकमंत्री आबिटकर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

विमानाने ७२ विद्यार्थी इस्रोच्या अभ्यास दौऱ्यावर रवाना

कोल्हापूर प्रतिनिधी (विनायक जितकर) – विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकांपुरते ज्ञान न ठेवता प्रत्यक्ष अनुभवातून विज्ञान समजून घ्यावे. त्यांच्यात गुणवत्ता, जिज्ञासा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, यासाठीच इस्रोसारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेला भेट देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे,” असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, कोल्हापूर यांच्या अधिनस्त असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील शिरोळ, राधानगरी, मसूदमाले ( पन्हाळा ) व गगनबावडा येथील शासकीय निवासी शाळांमधील एकूण ७२ विद्यार्थी भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो), हैदराबाद येथे अभ्यास दौऱ्यासाठी आज सकाळी कोल्हापूर विमानतळावरून रवाना झाले.

अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून दिनांक ९ ते १३ जानेवारी २०२६ या कालावधीत हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यात विद्यार्थ्यांना इस्रोतील संशोधन प्रक्रिया, उपग्रह व अवकाश तंत्रज्ञान, तसेच अंतराळ संशोधनातील भारताच्या उल्लेखनीय प्रगतीची प्रत्यक्ष माहिती मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयीची आवड वाढून भविष्यातील करिअरच्या नव्या दिशा खुल्या होतील, असा विश्वास पालकमंत्री आबिटकर यांनी व्यक्त केला.

“इस्रोसारख्या संस्थेला भेट देणे ही विद्यार्थ्यांसाठी केवळ सहल नसून ती त्यांच्या आयुष्याला दिशा देणारी प्रेरणा आहे. आर्थिक परिस्थितीमुळे मागासवर्गीय प्रवर्गातील कोणताही विद्यार्थी शिक्षण व अनुभवाच्या संधींपासून वंचित राहू नये, याची ठाम भूमिका शासनाने घेतली आहे,” असेही त्यांनी सांगितले. सामाजिक समानता, संधीची समान उपलब्धता आणि शैक्षणिक परिवर्तनाच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या उपक्रमाबद्दल पालक वर्गातून विशेष समाधान व कौतुक व्यक्त होत असून, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासनाने उचललेल्या या प्रेरणादायी पावलाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना आत्मविश्वासाने मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि ती पूर्ण करण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमास समाज कल्याण पुणे विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त श्रीमती वंदना कोचुरे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सचिन साळे, जिल्हा कोषागार अधिकारी अश्विनी नराजे, जिल्हा माहिती अधिकारी, समाज कल्याण कार्यालय अधीक्षक सचिन पाटील, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक सुप्रिया काळे, समाज कल्याण निरीक्षक श्री. सुनील पाटील यांच्यासह अधिकारी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक व पालक उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.