प्रा. अर्जुन आबिटकर यांची ओळख ही अभ्यासू, शांत पण अचूक निर्णय घेणारे नेतृत्व… सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात काही नेतृत्व अशी आहेत, जी कधीच प्रकाश झोतात नसतात; मात्र त्यांच्या विचारांचा, निर्णयांचा आणि रणनीतींचा ठसा प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत उमटलेला असतो. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर हे अशाच नेतृत्वाचे प्रतिनिधित्व करतात. आज १ जानेवारी रोजी त्यांचा वाढदिवस, हा त्यांच्या कार्याचा आणि राजकीय वाटचालीचा आढावा घेण्याचा योग्य क्षण आहे.
प्रा. अर्जुन आबिटकर यांची ओळख ही अभ्यासू, शांत पण अचूक निर्णय घेणारे नेतृत्व अशी आहे. राजकारणाकडे केवळ सत्तेच्या दृष्टीने न पाहता, संघटन, विकासकाम आणि लोकविश्वास या त्रिसूत्रीवर ते आपले काम उभे करतात. कोणताही निर्णय घेताना स्थानिक समिकरणे, कार्यकर्त्यांची मानसिकता आणि भविष्यातील परिणाम यांचा सखोल विचार हीच त्यांची कार्यशैली आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या माध्यमातून त्यांनी सहकार क्षेत्रात विश्वासार्हता निर्माण केली. शेतकरी, ग्रामीण भागातील संस्था आणि सर्वसामान्य घटक यांना आर्थिक स्थैर्य मिळावे, या भूमिकेतून त्यांनी बँकेच्या निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला. सहकार ही केवळ आर्थिक संकल्पना नसून, राजकारणाची सामाजिक पायाभरणी आहे, असा त्यांचा ठाम विश्वास आहे.
राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. प्रकाश आबिटकर यांचे ते छोटे बंधू असले, तरी त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण केली आहे. भावाच्या नेतृत्वाला पूरक ठरणारी, पण स्वतःच्या कर्तृत्वावर उभी असलेली ही वाटचाल उल्लेखनीय ठरते. आजच्या चंचल राजकीय वातावरणात संयम, दूरदृष्टी आणि संघटनात्मक शिस्त जपणारे नेतृत्व दुर्मिळ आहे. प्रा. अर्जुन आबिटकर हे अशाच नेतृत्वाचे उदाहरण आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस यश लाभो, हीच अपेक्षा.
शुभेच्छुक – विनायक जितकर



















































