Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375
|
नागावं.- (रुपेश आठवले)- 16 डिसेंबर रोजी अंध मतिमंद व दिव्यांग आणि विशेष व्यक्तींकरिता एनसीसी भवन येथील राम मंगल कार्यालय येथे दिव्यांग सांस्कृतिक महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन केले होते
या कार्यक्रमात गुजरात येथील एसी भारत सरकार चे राष्ट्रीय चीफ श्री हरीशभाई पटेल यांच्या तर्फे बिग मॅडी वेल्फेअर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ मॅडी तामगावकर यांची महाराष्ट्र व गोवा राज्य करिता मूलनिवासी आदिवासी यांच्या करिता राबवण्यात येणाऱ्या कला, क्रीडा, सामाजिक व सांस्कृतिक योजनेच्या प्रचार व प्रसार विविध उपक्रमाकरिता त्यांची निवड करण्यात आली आहे.डॉ. मॅडी. यांनी दिव्यांग, गतिमंद, अंध कर्णबधिर, मूकबधिर व तृतीयपंथीय यांच्याकरिता गेले पंधरा वर्षे सामाजिक कार्य केले आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्य राखीव पोलीस दल बल गट 16 असी. कमांडट श्री सदानंद सदाशिव, अभिनेत्री अर्चना तेंडुलकर,रोख ठोखचे डॉ सुरेश राठोड, युवा पत्रकार संघाचे संस्थापक शिवाजी शिंगे, डीआयडी गार्गीज क्लबच्या नूतन उपाध्यक्ष सारिका भोसले, ॲ.सविता कर्णिक यांच्या उपस्थितीत
तर प्रमुख उपस्थिती वार्ता सम्राट चे संपादक प्रकाश लिंगनूरकर, एसपी नाईन चॅनलचे मॅनेजिंग डायरेक्टर सागर पाटील, साप्ताहिक दक्षराज्य संपादक राजेश वाघमारे, RSP अधिकारी अभिजीत तासगावकर, विनायक कांबळे, राहुल जाधव यांच्या उपस्थितीत पार पडला.या कार्यक्रमात सूत्रसंचालन आर. जे. स्वप्निल पन्हाळकर यांनी केले, शितल मिश्रा, सागर कांबळे, डॉ अशोक सूर्यवंशी, सचिन कसलकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
|
आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...
Post Views: 378