कोल्हापूर,इचलकरंजी महानगरपालिकेत रिपब्लिकन पक्षाला सन्मान जनक जागा देत नसतील तर स्वतंत्र लढा- ना. रामदासजी आठवले साहेब.
रुपेश आठवले:नागांव
इचलकरंजी महानगरपालिकेसाठी महायुतीकडून रिपब्लिकन पक्षाला सन्मानपूर्वक जागा मिळाव्या अशी मागणी प्रा. शहाजी कांबळे यांनी केली आहे. राज्यात महानगरपालिका निवडणुका लागले आहेत त्यामध्ये महायुतीचा घटक पक्ष असणारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला इचलकरंजी महानगरपालिकेसाठी दोन जागेची मागणी त्यांनी केली आहे त्यामध्ये प्रभाग तीन व सहा यामधून इच्छुक असे उमेदवार आहे रिपब्लिकन पक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा महायुती मधील एक जबाबदार घटक पक्ष आहे महानगरपालिकेसाठी समान पूर्वक जागा महायुतीकडून मिळाले पाहिजे असा प्रस्ताव महायुतीतील नेत्यांकडे पाठवला आहे .
रिपब्लिकन पक्ष हा लढाऊ आहे गोरगरीब कष्टकरी येथे प्रतिनिधित्व करणारा तळागाळातील लोकांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी झगडणारा पक्ष आहे म्हणून रस्त्यावरचा लढणारा पक्षाचा समाज प्रतिनिधी म्हणून सभागृहात जावा अशी आपली यावेळी ची मागणी आहे यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्याचे संघटन सचिव प्रा. शहाजी कांबळे इचलकरंजी शहराचे शहराध्यक्ष श्रीनिवास कांबळे ,बटू भामटेकर ,विनोद कुरणे, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
|
कोल्हापूर,इचलकरंजी महानगरपालिकेत रिपब्लिकन पक्षाला सन्मान जनक जागा देत नसतील तर स्वतंत्र लढा- रामदास आठवले आज मुंबई बांद्रा येथील पक्ष कार्यालयामध्ये रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांची रिपब्लिकन पक्षाचे कोल्हापूर जिल्ह्याचे सचिव मा: सतीश माळगे (दादा )यांनी भेट घेतली यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी,कोल्हापूर महानगरपालिकेच्या संदर्भात चर्चा झाली असता नामदार रामदासजी आठवले साहेब यांनी महायुती जर सन्मान जनक जागा देत नसेल तर कार्यकर्त्यांना स्वतंत्र लढण्यासंदर्भात सूचना आठवले साहेब यांनी केल्या यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राधानगरीचे नेते कुंडलिक कांबळे,होलार आघाडीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पारसे (अण्णा) उपस्थित होते. |
शहाजी कांबळे नेमक काय म्हणाले पहा VIDEO
लिंक ला क्लिक करा.



















































