‘एसईए’च्या सहसचिव पदी रत्नाकर मोहिते

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

रत्नाकर मोहिते हे २००६ पासून संघटनेमध्ये विविध पदावर कार्यरत

कोल्हापूर – वीज क्षेत्रात प्रभावीपणे कार्यरत असणाऱ्या सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन (एसईए) या अभियंत्यांच्या संघटनेची जिल्हा कार्यकारिणी नुकतीच सर एम विश्वेश्वरय्या मेमोरियल हॉल, ताराबाई पार्क येथे निवडण्यात आली. यामध्ये संघटनेच्या सहसचिव पदी रत्नाकर मोहिते यांची पुढील एक वर्षासाठी निवड करण्यात आली आहे.

रत्नाकर मोहिते हे २००६ पासून संघटनेमध्ये विविध पदावर कार्यरत आहेत. रत्नाकर मोहिते यांना सलग चौथ्या वर्षी सहसचिव पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. याच बरोबर या कार्यकारणीत प्रविभागीय सचिव नागेश बसरीकट्टी, प्रविभागीय अध्यक्ष संदीप कांबळे तर विभागीय निवडीमध्ये नितीन शिंदे, ऋषिकेश खांबे, अभय आळवेकर, विवेक मोरे, प्रदीप चौगुले, सुभाष पाटील, संदीप बाणदार, विनायक पाटील, संदीप पाटील, विठ्ठल चौगुले, केतन पोवार, चैतन्य इनामदार, सम्राट पाटील, दत्तात्रय पांढरे यांची निवड झाली आहे.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुरेश पोवार यांनी काम पहिले. यावेळी ऑल इंडिया पॉवर इंजिनियर्स फेडरेशनचे विनायक पाटील, सुनील जगताप, प्रशांत चिकणीस, राजेंद्र हजारे, दिलीप महाजन, विजय राणे, विक्रांत सपाटे, अभियंता क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष नितीन धुमाळ, बाजीराव आबिटकर, अश्विन वागळे यांची विशेष उपस्थिती होती. ‘एसईए’ संघटना ग्राहकांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडणारी, अभियंत्यांच्या मागण्यांसाठी लढणारी ऊर्जाक्षेत्रातील महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संघटना आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.