पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते गुडाळ येथे गुणवंतांचा भव्य सत्कार सोहळा

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

गुडाळेश्वर क्रीडा मंडळ गुडाळ व श्री. लक्ष्मी नारायण सहकार व उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यकमाचे आयोजन

गुडाळ (विनायक जितकर) – शिक्षण, क्रीडा व इतर क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंतांचा भव्य सत्कार सोहळा शनिवार दिनांक २० रोजी. गुडाळ येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. गुडाळेश्वर क्रीडा मंडळ गुडाळ व श्री. लक्ष्मी नारायण सहकार व उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर होते. तर विशेष उपस्थितीत निवृत्त डी. वाय. एस. पी. बी. आर. पाटील व लक्ष्मी नारायण समूहाचे संस्थापक शिवाजी पाटील होते.

या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते कु. सिद्धार्थ संग्राम पाटील यांची राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड. ग्रामीण परिसरातून पुढे येत कठोर परिश्रम, शिस्त आणि चिकाटीच्या बळावर सिद्धार्थने मिळवलेले हे यश केवळ गुडाळ नव्हे, तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. यावेळी बोलताना पालकमंत्री आबिटकर म्हणाले, गुणवंतांचा सत्कार म्हणजे नव्या पिढीला प्रेरणा देणारा क्षण “गुणवंतांचा सत्कार म्हणजे केवळ सन्मान नव्हे, तर त्यांच्या कष्टांना आणि जिद्दीला दिलेली प्रेरणादायी दाद आहे. क्रीडा व शिक्षण क्षेत्रातील यशामुळे युवकांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि समाजाला सकारात्मक दिशा मिळते. आज सत्कार झालेल्या गुणवंतांनी आपल्या यशातून अनेक तरुणांसमोर आदर्श निर्माण केला असून, भविष्यात त्यांनी राज्य व देशाचे नाव उज्ज्वल करावे,” असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक संग्राम पाटील गुडाळकर यांनी केले तर आभार आनंदा शिंदे यांनी मानले. यावेळी दीपक शेट्टी, मानसिंग पाटील, तानाजी पाटील, विजय पाटील, सुभाष जाधव, सचिन वारके, धीरज करळकर, महादेव कोथळकर, सुभाष पाटील, शांताराम बुगडे यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत गुडाळेश्वर मल्टिपर्पज हॉलमध्ये पार पडलेला हा सोहळा प्रेरणादायी व गौरवपूर्ण ठरला.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.