सांगली महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या  इच्छुक उमेदवारांच्या आज व उद्या मुलाखती

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांची माहिती

सांगली प्रतिनिधी – सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उद्या शनिवारी दिनांक 13 डिसेंबर व रविवार दिनांक 14 डिसेंबर रोजी पाटीदार भवन, नंदादीप हॉस्पिटल समोर, कॉलेज कॉर्नर रोड, सांगली येथे घेण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महाराष्ट्र राज्य निवडणूक प्रमुख महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात भाजप निवडणूक कार्यक्रम खंबीरपणे राबवत आहे. त्यांच्या आदेशाने सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. या मुलाखती सांगलीचे माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे, सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटक मकरंद देशपांडे व भाजपचे जिल्हा शहराध्यक्ष प्रकाश ढंग या पाच जणांच्या समितीमार्फत घेण्यात येणार आहेत. 

यावेळी प्रकाश ढंग म्हणाले, सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुक 2025 साठी भारतीय जनता पार्टीतील प्रभाग क्रमांक 1 ते 8 या प्रभागातील इच्छुक उमेदवारांची मुलाखत येत्या शनिवारी दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजल्यापासून पाटीदार भवन, नंदादीप हॉस्पिटल समोर, कॉलेज कॉर्नर रोड, सांगली येथे घेण्यात येणार आहेत. तर प्रभाग क्रमांक ८ ते २० या प्रभागांच्या मुलाखती रविवार दिनांक 14 डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून घेण्यात येणार आहेत. तरी प्रभाग क्रमांक 1 ते 8 मधील भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांनी पाटीदार भवन येथे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्हा शहराध्यक्ष प्रकाश ढंग यांनी केले आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.