गोकुळमध्ये आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साजरा

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्ताने संघ कर्मचारी पांडुरंग शेळके यांना भेटवस्तू देताना संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, युवराज पाटील, शशिकांत पाटील–चुयेकर, बयाजी शेळके.

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साधेपणाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने संघाने आपल्या दिव्यांग कर्मचार्‍यांना शुभेच्छा देऊन त्यांचा सन्मान व्यक्त केला.

यावेळी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, “आज आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त सर्व दिव्यांग कर्मचार्‍यांचे कौतुक करण्याची संधी मला मिळाली, हा दिवस समाजात दिव्यांग व्यक्तींच्या योगदानाची दखल घेण्यासाठी आणि त्यांचे हक्क सुरक्षित करण्यासाठी साजरा केला जातो. दिव्यांग कर्मचारी कोणत्याही संस्थेचा अविभाज्य भाग आहेत आणि त्यांना समान संधी, प्रोत्साहन व सहकार्य मिळाल्यास ते अधिक प्रभावीपणे कार्यरत राहतात.”असे मनोगत व्यक्त केले

याप्रसंगी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, युवराज पाटील, शशिकांत पाटील–चुयेकर, बयाजी शेळके संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.