डॉ. अमृतकुवर रायजादे यांना ‘वूमन ऑफ पॅशन’ पुरस्कार

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

बेळगाव येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत डी. वाय. पाटील फिजिओथेरपी कॉलेजचा गौरव

कोल्हापूर – डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, कोल्हापूरच्या प्राचार्या डॉ. अमृतकुवर रायजादे यांना बेळगाव येथे पार पडलेल्या इंटरनॅशनल फिजिओथेरपी कॉन्फरन्समध्ये ‘वूमन ऑफ पॅशन (एंटरप्रेन्युरियल एक्सलन्स)’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

केएलई विद्यापीठ, बेळगाव येथे इंटरनॅशनल फिजिओथेरपी कॉन्फरन्स ‘पर्ल फिजिओकॉन २०२५’आयोजित करण्यात आली होती. ‘शेपिंग द फ्युचर : टेक्नोलॉजी ड्रीव्हन पेशंट केअर’ या विषयावर झालेल्या परिषदेत जगभरातील 1200 हून अधिक प्राध्यापक, विद्यार्थी सहभागी झाले होते.

फिजिओथेरपी व्यवसायाप्रती असलेल्या वचनबद्धतेसाठी आणि शैक्षणिक नेतृत्वातील उत्कृष्टतेसाठी डॉ. रायजादे यांना भारतीय क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार डायना एडलजी व मान्यवरांच्या हस्ते ‘वूमन ऑफ पॅशन’ ने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर मॅन्युअल थेरपी सत्रासाठी पॅनेलिस्ट आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी फॉर न्यूरोनल प्लास्टिसिटी या विषयावरील अतिथी व्याख्यानासाठी अध्यक्ष म्हणून त्यांना सन्मान देण्यात आला. यावेळी काहेरचे कुलपती डॉ. प्रभाकर कोरे, कर्नाटक राज्य सहयोगी आणि आरोग्य सेवा परिषदेचे अध्यक्ष डॉ. इफ्तिखार अली, केंद्र सरकारच्या जीओथेरपी व्यावसायिक परिषदेचे सदस्य डॉ. अली इराणी, डॉ. व्हि.पी गुप्ता, डॉ. आशिष कक्कड, डॉ. केतन भाटीकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आयोजित विविध स्पर्धामध्ये महाविद्यालयाच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यानी यश मिळवले. यामध्ये डॉ. अदिती जाधव यांनी पीएचडी कॅटेगरी पेपर प्रेझेंटेशनमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला. पेपर प्रेझेंटेशनमध्ये स्नेहा पाटील यांनी (स्पोर्ट्स फिजिओथेरपी) प्रथम क्रमांक, रेवती चव्हाण (पेडियाट्रिक फिजिओथेरपी ) द्वितीय क्रमांक, हर्षिता पाटील(न्यूरो फिजिओथेरपी) द्वितीय क्रमांक, विनायक कुरळे (न्यूरो पिजी) प्रथम क्रमांक, सुनैना लाड (ओ.एम. टी पिजी ) प्रथम क्रमांक पटकावून महाविद्यालयाचा लौकिक वाढवला आहे .

प्राचार्या डॉ. अमृतकुवर रायजादे आणि सर्व सहकारी यांचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.