मल्हारपेठ प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप
क्लास वन ऑफिसर गीतांजली साठे यांच्या यशानिमित्त उपक्रम — विद्यार्थ्यांमध्ये आनंदाची लहर
मल्हारपेठ (रुपेश आठवले ता. पन्हाळा):
कुमार विद्यामंदिर, मल्हारपेठ प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य (वही-पेन) व खाऊचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे निवृत्त मुख्याध्यापक श्री. गोपाळराव साठे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. मृणालिनी सातपुते यांनी केले. या उपक्रमासाठी गीतांजली साठे यांच्या पती राहुल आपटे यांचे सहकार्य लाभले. गीतांजली गोपाळ साठे यांची क्लास वन ऑफिसर पदावर निवड झाल्याबद्दल अभिनंदन मिरवणुकीस आलेल्या विद्यार्थ्यांना काहीतरी देणे या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. हा उपक्रम स्तुत्य व प्रेरणादायी असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
क्रांती गुरु सोशल फाउंडेशन चे उपाध्यक्ष यशवंत साठे यांच्या हस्ते मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.उपसरपंच राजू महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांनी ज्ञानाच्या माध्यमातून गावाचे नाव उज्ज्वल करावे असे सांगितले.
तर क्रांती गुरु सोशल फाउंडेशनचे सचिव विवेक साठे यांनी शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करताना विद्यार्थ्यांना प्रेरणा देत म्हटले की —“विद्येची कास धरून जीवन महान करा आणि गीतांजली साठे यांच्यासारखे उत्तुंग ध्येय गाठा.”
यावेळी श्री. गोपाळराव साठे म्हणाले की, “शाळेला शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध करून प्रज्ञाशोध व शिष्यवृत्ती परीक्षेचा मल्हारपेठ पॅटर्न निर्माण करू.”
कार्यक्रमासाठी उपस्थित:शिक्षक-शिक्षिका वृंद, विद्यार्थी-पालक, ग्रामपंचायत सदस्य राजू नारकर, सौ. रुक्मिणा साठे, आरंभी साठे, कुमारी आरंभी, मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
आभार प्रदर्शन: सौ. फासे मॅडम
सुत्रसंचलन: विवेक साठे यांनी मानले.



















































