….ग्रामपंचायतीपासून खासदारकीपर्यंत त्यांनी लोकांचा विश्वास जपला

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

रुकडी (ता. हातकणंगले+रुपेश आठवले) – लोकनेते स्वर्गीय खासदार बाळासाहेब माने यांच्या स्मृती जपण्यासाठी उभारण्यात आलेल्या “लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब माने प्रवेशद्वार” या भव्य कमानीचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते रविवारी संपन्न झाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक खासदार धैर्यशील माने यांनी केले. अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका निवेदिता माने या होत्या. या प्रसंगी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री उदय सामंत, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार राहुल आवडे, आमदार अशोकराव माने, माजी आमदार सुजित मिणचेकर, सुरेश हळवणकर, अरुण इंगवले, अविनाश बनगे, रवींद्र माने आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटनानंतर आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “शून्यातून विश्व निर्माण करणारे, जनसामान्यांच्या मनात स्थान निर्माण करणारे नेते म्हणजे स्वर्गीय खासदार बाळासाहेब माने. ग्रामपंचायतीपासून खासदारकीपर्यंत त्यांनी लोकांचा विश्वास जपला. या कमानीखालून सामाजिक उन्नतीचा मार्ग तयार होईल.” ते पुढे म्हणाले की, “सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि बदल घडवणे हेच त्यांचे ध्येय होते. त्यांनी लोककल्याणाच्या माध्यमातून जनतेला न्याय आणि आधार दिला. ‘लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही’, ही योजना त्यांच्या लोकाभिमुख विचारांचीच फलश्रुती आहे.” कार्यक्रमात विविध मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला.

या लोकार्पण सोहळ्यामुळे रुकडी परिसरात उत्साहाचे वातावरण होते. ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. स्वर्गीय बाळासाहेब माने यांचे कार्य, विचार आणि जनसंपर्क आजही जनतेच्या मनात अजरामर आहेत.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.