क्रांतीकारकांमध्ये शौर्य जागृती करणार्या ‘वंदे मातरम्’चे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सामूहिक गायन…
कोल्हापूर – भारतामध्ये क्रांतीची ज्वाळा निर्माण करणार्या वंदे मातरम् या बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी रचलेल्या गीताच्या रचनेला ७ नोव्हेंबरला (कार्तिक शु. ९) १५० वर्षे पूर्ण झाली. या गीतामुळे स्वातंत्र्याच्या लढ्यात हौतात्म्य पत्करण्याचे आणि इंग्रजांच्या गोळ्या अन् लाठ्या छातीवर घेण्याचे बळ क्रांंतीकारकांमध्ये निर्माण झाले. त्यामुळे नागरिकांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन त्यांची मने राष्ट्रभक्तीने प्रज्ज्वलीत करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामूहिक ‘वन्दे मातरम्’चे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी परिसरात असलेले विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते, तसेच हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांची माहिती देणारे फलक हातात धरण्यात आले होते. याच प्रकारे जिल्ह्यात विविध ठिकाणी सामूहिक ‘वन्दे मातरम्’चे कार्यक्रम घेण्यात आले.
या प्रसंगी उपस्थित शिवसेनेचे आमदार आणि राज्य नियोजन महामंडळाचे अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘‘दसरा चौकात सहस्रो नागरिकांच्या उपस्थितीत सामूहिक ‘वन्दे मातरम्’चा कार्यक्रम घेऊ.’’ हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी यांनी, ‘सर्व शाळा आणि महाविद्यालय यांमध्ये कायमस्वरूपी संपूर्ण ’वन्दे मारतम्’ म्हणण्यात यावे’, अशी मागणी केली.
या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सुनील सामंत, हिंदुत्वनिष्ठ श्री. रामभाऊ मेथे, श्री. सतीश मांगले, मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव आणि श्री. आप्पासाहेब गुरव, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. कैलास दीक्षित, हिंदू महासभेचे सर्वश्री नंदकुमार घोरपडे, प्रशांत पाटील, विकास जाधव, सकल हिंदू समाजाचे श्री. सनी पेणकर, भाजपच्या सौ. वंदना बंबलवाड, हिंदू एकता आंदोलनाचे शहरप्रमुख श्री. गजानन तोडकर, श्री. दिलीप भिवटे, भाजपचे श्री. अमेय भालकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. अनिरुद्ध कोल्हापुरे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री शिवानंद स्वामी, महेंद्र अहिरे, आदित्य शास्त्री यांसह अन्य उपस्थित होते.












































