*फुगे विक्रेत्याच्या वर्षाच्या तान्हुल्याचे अपहरण* VIDEO बघा शेवटी… Link क्लीक.. You tube पहा
दिवाळीच्या पहिल्याच दिवशी झालेल्या अपहरणानंतर 72 तासांच्या शर्थीच्या शोधमोहीमेनंतर लेकरू आईच्या कुशीत परत; सांगली एलसीबीचे कौतुकास्पद कार्य
*सांगली एलसीबीकडून टोळीचा पर्दाफाश; एकास अटक; सावर्डेतील व्यावसायिकास विकण्याचा डाव फसला*
*सांगली/ प्रतिनिधी*
राजस्थानहुन फुगे विकण्यासाठी सांगलीत आलेल्या गरीब दांपत्याच्या वर्षाच्या तान्हुल्याचे दिवाळीच्या पहिल्याच दिवशी अपहरण करून चिपळूणच्या ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकास विकण्याचा डाव सांगली (एलसीबी) स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने उधळून लावला. मुलाचे अपहरण करणाऱ्या तीन जणांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात सांगली एलसीबीला यश आले असून एकास अटक करण्यात आली असून फरार महिलेसह दोघांचा शोध सुरू आहे.
दिवाळीच्या पहिल्या दिवशी अपहरण झालेल्या तान्हुल्याचा पन्नासहुन अधिक अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांनी दिवाळीचे 72 तास घराबाहेर काढून रात्रदिवसाच्या अथक परिश्रमातून लेकरू आईच्या कुशीत विसावलं. तीन दिवस दिवस टाहो फोडत चिमुकल्याच्या आशेने उपाशी असलेल्या गरीब दांपत्याला आपले लेकरू मिळताच आनंदाला पारावार उरला नाही आणि पोलिसांनी दांपत्याच्या चेहऱ्यावरील आनंदाश्रू पाहून खरी दिवाळी केल्याचा जल्लोष साजरा केला.
इनायत अब्दुलसत्तार गोलंदाज (वय ४३, रा. किल्ला भाग, मिरज, जि. सांगली) अशी अटक केलेल्या संशयिताचेनाव असून इम्तीयाज पठाण व त्याची पत्नी वसीमा इम्तीयाज पठाण हे फरार आहेत. वसीमा हिची बहीण वहिदा ही सावर्डे ( चिपळूण ) येथे असते. तिची सावर्डे येथील ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक सचिन गणपत राजेशिर्के व त्यांची पत्नी यांच्याशी ओळख होती. वाहिदा हिने राजेशिर्के यांची वहिदा याच्याशी गाटभेट घडवली. वसीमा हिच्यासह तिघांनी बाळ देतो म्हणून अडीच लाखाला व्यवहार ठरविला. वर्षापूर्वी दीड लाख रुपये तिघांना देण्यात आले.
दिवाळीच्या पहिल्या दिवशी तिघांनी रस्त्याच्या कडेला झोपलेल्या गरीब दांपत्याचे वर्षाच्या तान्हुल्याचे अपहरण केले होते. फुगे विक्रेता विक्रम पषपचंद बागरी ( रा.विश्रामबाग चौक सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्ष बारवकर,पोलिस उपअधिक्षक प्रवीण गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे व त्यांच्या टीमने ही कौतुकास्पद कामगिरी केली.
यामध्ये सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार, चेतन माने, पोलिस हवालदार संदीप नलावडे, अमीरशा, सपना गराडे, अमर नरळे, सागर लवटे, नागेश खरात, दरिबा बंडगर, संदीप गुरव, मच्छिद्र बर्डे, सतिश माने, अनिल कोळेकर, उदयसिंह माळी, महादेव नागणे, सुनिता शेजाळे, विक्रम खोत, केरूबा चव्हाण, विनायक सुतार, सुरज थोरात, सुशिल म्हस्के, श्रीधर बागडी, ऋतुराज होळकर, सुमित सुर्यवंशी, सोमनाथ पंतगे, सत्या पाटील, सावर्डे पोलिस ठाण्याचे गंगनेष पट्टेकर, उमेश कांबळे, साधना ओमासे यांनी सहभाग घेतला.
















































