“बदलती जीवनशैली आणि वाढणारे घटस्फोटाचे प्रमाण : विवाहसंस्थेसमोरील नवे आव्हान!”

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

लेखिका : अॅड. वृषाली सावंत, चिपळूण
संपर्क : 8087807579 | ई-मेल : Vrushalisawant506@gmail.com
कोकण कन्या सोशल वेल्फेअर फाउंडेशन, मान्यताप्राप्त संस्था

बदलती जीवनशैली व वाढणारे घटस्फोटाचे प्रमाण

विवाह संस्थेची उत्क्रांती
प्राचीन काळी लैंगिक जीवन पूर्णपणे मुक्त होते. कोणतीही कौटुंबिक व विवाह सूत्रबद्ध प्रणाली नव्हती आणि लैंगिक समाधान हा एकमेव विचार होता. लैंगिक संबंध अनियमित राहिली म्हणून पितृत्व निश्चित केले जाऊ शकत नाही व केवळ प्रसूती स्थापित केली जाऊ शकते हे लक्षात येऊ लागले.नंतरच्या टप्प्यावर मुलावर निश्चित पुरुषाची मालकी असणे आवश्यक वाटले आणि त्यामुळे मुलाचे पितृत्व जाणून घेणे आवश्यक झाले आणि विवाह संस्थेचा उदय झाला. एका पुरुषाने एक स्त्रीशी विवाह करणे ही संस्कृती निर्माण झाली व स्त्री व पुरुष विवाहबद्ध होऊन सुखी संसार व कुटुंब नियोजन करू लागले.

घटस्फोट उद्भव
प्रगती,शिक्षण, सामाजिक सुधारकता, अहंकार, स्वतंत्र विचार प्रणाली, आर्थिक सक्षमता आणि अश्या बऱ्याच कारणाने कुटुंबामध्ये मतभेद होऊ लागले. मतभेदातून एक टोकाची भूमिका घेऊन,
झटपट विवाह,ऑनलाईन शादी डॉट कॉम,फ्री बुक विवाह, लिव्ह अँड रिलेशनशिप,ताटातूट अनुभवाचे बोल माहिती नसणे, निराश्य येणे, परिस्थितीशी सामना करण्याचे सामर्थ नसणे, तडजोड करण्याचा अभाव, एकमेकांना सामंजस्यपणा न जमणे. त्यातून घटस्फोट संस्थेचा विकास होत गेला.

घटस्फोट कायदे
घटस्फोट योग्य नियोजन व न्याय यातून व्हावा आणि कुठेही अन्याय होऊ नये म्हणून वेगवेगळे कायदे निर्माण झाले.त्यातील काही कायदे खाली प्रमाणे.
1) हिंदू विवाह कायदा आणि घटस्फोट 1955.
2) शरीयत कायदा 1937.
3) ख्रिश्चन विवाह कायदा 1872.
4) पारशी विवाह आणि घटस्फोट कायदा 1936.
काही केस लॉ खालील प्रमाणे
नवनीत कोहली v/s नीलू कोहली 2006
या केस मध्ये हिंदू विवाह कायदा 1955 चे कलम 13 (1)(ia) हे कलम क्रूरतेशी संबंधित आहे, जो कोणत्याही पती-पत्नीला क्रूरतेच्या आधारावर घटस्फोटाच्या डिक्रीसाठी याचिका दाखल करण्याची परवानगी देते. ज्याचे वर्गीकरण मानसिक किंवा शारीरिक किंवा अशी परिस्थिती जी तिच्या किंवा त्याचा जीव, अंग, किंवा आरोग्य धोक्यात आणते.

नवीन कोहली निकाल हा केवळ एकच खटला नाही त्याने घटस्फोटाच्या कायद्यामध्ये ब्रेक डाऊन थिअरी जोडण्याचा सल्ला दिला होता तथापि त्यांनीही या प्रकरणात दिलेल्या तर्काद्वारे बदल घडवून आणण्यास विधिमंडळांना प्रवृत्त केले आहे.

१ मे २०२३ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने एक महत्त्वपूर्ण निकालाद्वारे जाहीर केले की ज्या पती-पत्नीचे घटस्फोट घेण्यावर एकमत झालेले आहे किंवा लग्न पुढे नेण्यास दोघेही असमर्थ आहेत, अशा जोडप्यांना सर्वोच्च न्यायालयातून घटनेच्या अनुच्छेद १४२ अनुसार थेट घटस्फोट मिळू शकतो.

काही विवाहांमधील संबंध इतके ताणले गेलेले असतात की त्यात सुधारणा होण्याची कोणतीही शक्यता संपलेली असते, अशा विवाहातील जोडप्यांचे जर घटस्फोट घेण्यावर एकमत झालेले असेल तर त्यांना कौटुंबिक न्यायालयात पाठविण्याची गरज नाही. कौटुंबिक न्यायालयांमध्ये निकाल लागण्यासाठी ६ ते १८ महिन्यांची वाट पाहावी लागते. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संजय किशन कौल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दिलेला निकाल महत्त्वपूर्ण ठरतो. “ज्या विवाहातील नात्यामध्ये कोणतीही सुधारणा होण्याची थोडीही शक्यता नाही, अशा विवाहांना सर्वोच्च न्यायालय रद्दबातल ठरवू शकते. यामुळे सार्वजनिक धोरणाच्या विशिष्ट किंवा मूलभूत तत्त्वांचा भंग होणार नाही,” असे मत खंडपीठाने व्यक्त केले.
16 जून २०२३ रोजी कर्नाटक हायकोर्टाने एक निर्णय दिला. ‘हिंदू विवाह कायद्यानुसार विवाहित जोडप्यामध्ये लैंगिक संबंध नसणं हे घटस्फोटाचे कारण असू शकते. पण भारतीय दंड संहिता (IPC) अंतर्गत ते क्रौर्य मानलं जाणार नाही.’

भारतीय कायदा असो किंवा न्यायालयांचे निर्णय, दोघांच्याही मते, वैवाहिक जीवनात पती-पत्नीमधील लैंगिक संबंध महत्त्वाचे मानले जातात.जर जोडीदारापैकी एकाने आपल्या जोडीदारासोबत दीर्घकाळ लैंगिक संबंध ठेवले नाहीत तर ते क्रौर्य मानले जाईल आणि लैंगिक संबंध नसणे घटस्फोटाचे कारण होऊ शकते, असं न्यायालयांनी त्यांच्या निर्णयांमध्ये अनेकदा सांगितलं आहे.
पण अनेक तज्ञांच्या मते, या कायदेशीर तरतुदीचा पुरुषांकडून अधिक वापर केला जातो. कारण वैवाहिक जीवनात सामान्यतः पतीला लैंगिक सुख देणं हा पत्नीचा धर्म अशी समाजाने धारणा करून ठेवली आहे. पत्नीलाही तेवढाच हक्क आहे हे विसरले जातं.
घटस्फोटाची कारणे
काही वाचनातून, अभ्यासातून, व काही केसेस यांमधून घटस्फोटाची जी महत्त्वाची कारणे समोर आली आहे ती पुढील प्रमाणे आहेत.

1) कौटुंबिक हिंसाचार
स्त्री ला घरातील व्यक्तींकडून अश्लील बोलणे ,मारहाण करणे, कामाची सक्ती करणे,दारू पिऊन दंगा व त्यातून शिवीगाळ व मारामारी, माहेरच्या व्यक्तींकडून पैसे व लक्झरी वस्तूंची डिमांड करणे, स्मार्टफोन मोबाईल वापरू नये यांची सक्ती करणे, व मोबाईलचा वापर केल्यास संशय घेणे व त्यावरून वेगळा छळ करणे.
2) राईट टू हायजिन –
राईट टू हायजिंग यासाठी घटनेत अधिकार दिले आहेत. नवीन फॅड नुसार आधुनिक काळात या अधिकाराचा वापर करून सुद्धा घटस्फोट मागितल्या जातो.
उदा. सारखा आळस व ढेकर देतो, पार्टनर रोज अंघोळ करत नाही, झोपताना जास्तच घोरतो. अशा शुल्लक कारणांनी सुद्धा आज-काल घटस्फोट मागितला जातो. याचा अर्थ असा की पाश्चात संस्कृतीचा आज लोकांच्या डोक्यावर पगडा आहे, त्यातून या गोष्टी सुचत जातात.

घटस्फोटाच्या प्रमुख कारणांमध्ये —

  • कौटुंबिक हिंसाचार

  • शिक्षण व माहिती तंत्रज्ञानाचा अतिवापर

  • लग्नपूर्व / लग्नानंतरचे अफेअर

  • लैंगिक असमाधान किंवा समानता विषयक कारणे

  • आर्थिक स्वातंत्र्यामुळे वाढलेला अहंकार

  • सोशल मीडियावरील अवास्तव तुलना

  • कुटुंबीय आणि मित्रांकडून होणारा चुकीचा हस्तक्षेप

विवाहसंस्थेला वाचविण्याची गरज

मतभेद हे नैसर्गिक असतात, पण संवाद व सहनशीलता या नात्याला टिकवू शकतात.
एखादं खेळणं तुटलं की आपण ते दुरुस्त करतो — नातेसंबंधही तसेच जपले पाहिजेत. एकमेकांना समजून घेतल्यास अनेक संसार वाचू शकतात.

3) शिक्षण व माहिती तंत्रज्ञाचा अतिवापर.-
शिक्षण घेऊन प्रगतीपेक्षा अधोगती जास्त होत चालली आहे. हेवे दावे व तुलना करण्याचे प्रमाण वाढले आहे. पार्टनर ने एकमेकांना वेळ न घेता रिल्स व इतर इंटरनेट वरती जास्त वेळ वाया घालवणे. त्यामुळे एकमेकांच्या नात्यातील सुसंवाद खूप कमी होत गेला आहे. काळा बरोबर वाहत चाललेली पिढी आज दिसून येत आहे. रील्स मधील पार्टनर जसे 30 सेकंदात छान वागतात तसे आपल्या पार्टनर ने आपल्या बरोबर राहिले पाहिजे. इच्छा आकांक्षा पुरवल्या पाहिजेत. दागिने, महागडे गिफ्ट, प्रॉपर्टी, बर्थडे पार्टी, महागडे कपडे, पार्टनर ची ऐपत नसताना घेऊन देणे, आपल्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करणे. आपल्यालाही असाच पार्टनर पाहिजे ही सुप्त इच्छा मानत ठरवून राहणे.
4) लग्नाच्या अगोदरचे अफेअर किंवा लग्नानंतरचे अफेअर –
लग्न अगोदरच्या अफेअरमुळे स्त्री किंवा पुरुष पहिली प्रेयसी किंवा प्रियकर यांना आपल्या लग्न झालेल्या पती-पत्नीमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो व अपेक्षा भंग होतो. काही पार्टनर लग्नानंतर एकमेकांना पती-पत्नी हे स्थान सुद्धा देत नाहीत समाजासाठी एकत्र येऊन लग्न करतात. दिखाव्याचे आयुष्य जगतात व त्यातून मतभेद होतात.
काही लोक लग्नानंतर अफेअर करून प्रेमात पडतात व आपल्या पार्टनर बरोबर प्रामाणिक रहात नाहीत. फास्ट लाईफस्टाईल व एकमेकांना वेळ न देणे एकमेकांना समजून न घेणे यातून हे घटस्फोटाकडे वळतात.
5) लैंगिक समानता (समलिंगी )-
काही पुरुष व काही स्त्रिया ह्या समलिंगी असतात व ते लग्नाआधी समाजाच्या भीतीने किंवा घरच्यांच्या आग्रहामुळे समलिंगी असल्याचे सांगत नाहीत व परिणामी एकमेकांकडून इच्छित समाधान न मिळाल्यामुळे घटस्फोटाकडे वळतात.
6) आर्थिकदृष्ट्या सबळ व स्थिरअसल्यामुळे –
आर्थिकदृष्ट्या स्थिर असल्याने स्त्री व पुरुष कोणत्याही गोष्टींमध्ये तडजोड करायला तयार नसतात. इथे मीपणा व अहंकार निर्माण होतो .मी त्याच्या बरोबरीने आहे मी कशातच कमी नाही मग मी माघार का घेऊ ही भावना निर्माण होते. पती व पत्नी आर्थिक दृष्ट्या स्टेबल असल्यामुळे माझे कोणा वाचून काहीच अडत नाही असे ग्रह निर्माण होतात. भारतातील महाराष्ट्रात घटस्फोटाचे प्रमाण जास्त आहे व या तुलनेत घटस्फोटचे प्रमाण केरळमध्ये कमी आहे. अजून जास्त विचार केला तर घटस्फोटाचे महाराष्ट्रात मुंबई मध्ये घटस्फोटाचे प्रमाण सर्वात जास्त आहे.
7) ओव्हर विंडो पोर्नोग्राफी –
बदलत्या जीवनशैली प्रमाणे लोकांचा सोशल मीडिया वापर जास्त होत गेला. काय पाहिजे ते ऑनलाईन सर्च करता सर्व गोष्टी लगेच मिळतात यातून अनैसर्गिक लैंगिक व्हिडिओ बघण्याचे प्रमाण वाढले आहे. त्या व्हिडिओ प्रमाणे आपल्या पार्टनरनी साथ दिली पाहिजे व असे न झाल्यास निराशेतून घटस्फोट घेतले जातात.
8) कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांकडून अवास्तव दखल आणि सहभाग-
एकमेकांच्या मनातील इच्छा व विचारांचा आदर न झाल्याने किंवा न जुळल्याने तसेच जीवनातील स्वतःच्या एकमेकांच्या कामाचा व्याप पाहता, स्वतःच खरं मानणारा एक गट आणि यातून होणारा उद्रेक, इगो व व वरचस्वाची लढाई यातूनही घटस्फोट हे कारण उद्भवते. कोर्टाची पायरी चढली जाते.

अशी एक म्हण आहे नवरा बायकोच्या भांडणांमध्ये प्रत्यशात ब्रह्मदेवांनीही पडू नये.ही म्हण का प्रचलित झाली ते आता कळते..पती व पत्नीच्या भांडणांमध्ये स्त्री व पुरुषाचे फॅमिली मेंबर पडतात. व नको ते फुकटचे सल्ले देऊ लागतात. त्यामुळे दिशाभूल होऊन मतभेद अधिक वाढतात. मित्र-मैत्रिणींना घरातील सर्व प्रकरणे सांगणे व नको ते सल्ले घेणे. सर्व स्टोरी माहित नसताना मित्र-मैत्रिणी मध्यस्ती करतात व त्यामुळे नाते संबंधांमध्ये दुरावे निर्माण होतात. प्रकरण परिणामी घटस्फोटापर्यंत पोहचते.
घटस्फोट कधी घेतला पाहिजे –

1) आर्थिक गरजा पूर्ण न झाल्यास त्यातून घरगुती हिंसाचार झाल्यास आणि गोष्टी सहनशीलतेपलीकडे गेल्यास
2) अवैध संबंध व त्यातून मतभेद ,संशय ,मारहाण आणि भांडणे होत असतील तर.
3)हुंडा किंवा तत्स कारणासाठी घरातून प्रचंड छळ होत असेल तर
4) पती किंवा पत्नी सात वर्षापेक्षा जास्त दिवस गायब असल्यास, सापडत नसल्यास घटस्फोट घेता येतो.
या कारणांमुळे घटस्फोट घेतला नाही पाहिजे.
1) नवरा किंवा बायकोचा जॉब गेला असेल : जेव्हा नोकरी जाते तेव्हा जोडीदाराने सोडून न जाता त्यास सहकार्य केले पाहिजे ही एक सामाजिक गरज आहे.
2) अहंकार आणि जिध्द या गोष्टींमुळे कश्यातही तडजोड न करणे: दोघांनीही एकमेकांना आत्मसन्मान जपून व्यर्थ अहंकार न बाळगता एकमेकांस समजून घेता येते.
3)पराकोटीचे मतभेद: मतभेद हे सर्व कुटुंबात असतात.एकमेकांच्या बाजू समजून घेत,एकमेकांच्या बाबींना / मतांना योग्य मत देत अहंकार बाजूस ठेवत सुसंवाद साधता येतो.

लहानपणी आपण एखादे खेळणे तुटले तर घरातील आपल्याला ते रिपेअर करून द्यायचे व आपण ते आनंदाने परत खेळायचो, तसेच काही संसाराबाबत आहे. एखाद्या नात्याला तोडून टाकण्यापेक्षा आपल्या म्हणजे पती व पत्नी यांच्या स्वभाव, सवयी, वागणे,बोलणे, राहणीमान यात थोडा बदल करून नाते कसे टिकवता येईल हे पाहीले पाहिजे.नाहीतर पुढच्या पिढीला हे कधीच सांगता येणार नाही की आम्ही २५ किंवा ५५ वर्ष सुखाने संसार केला.एकमेकांना समजून घेतल्यास कोणतेच कुटुंब घटस्फोटापर्यंत पोहचणार नाहीत. सर्वांचे जीवन सुखी होईल व न्यायव्यवस्थेवरील भार सुद्धा कमी होईल. आशा करते यातून काही कुटुंब नक्कीच वाचतील.

आपल्याला कायदेशीर सल्ला पाहिजे, असल्यास तुम्ही आम्हाला मेल किंवा व्हाट्सअप करू शकता, कोकण कन्या सोशल वेल्फेअर फाउंडेशन भारत सरकार मान्यताप्राप्त कायदेशीर संघटना आपल्याला याबद्दल नक्की सहकार्य करेल.धन्यवाद..

Adv. वृषाली सावंत चिपळूण

Adv. वृषाली सावंत चिपळूण
मो. नं. :- 8087807579
Vrushalisawant506@gmail.com
ता. चिपळूण
जि. रत्नागिरी.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.