अभ्यंगस्नान, फराळ दिला कोल्हापूर बसस्थानकात

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

 

दीपोत्सवी उपक्रमात रा.प. कोल्हापूर आगारात अभ्यंगस्नान व फराळ वाटप

कोल्हापूर :
दरवर्षीप्रमाणे यंदाही रा. प. कोल्हापूर आगारात दीपावलीच्या पार्श्वभूमीवर रात्रवस्तीच्या चालक–वाहक बांधवांसाठी “अभ्यंगस्नान व फराळ वाटप” उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

हा उपक्रम आगार व्यवस्थापक अनिल म्हेत्तर व प्रमोद तेलवेकर यांच्या पुढाकारातून पार पडला. सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आगारातील दिपक घारगे, प्रकाश बावणे, निळकंठ कळंत्रे, अनिल कांबळे, वाघेला, चावरे, कोले आदी कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने परिश्रम घेतले.

 

चालक–वाहकांच्या विश्रांतीगृहात आयोजित या उपक्रमात १०६ रात्रवस्तीच्या चालक–वाहकांनी अभ्यंगस्नान साहित्य व फराळाचा लाभ घेतला. दिवाळीच्या आनंदात सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र सहभागी होत कुटुंबवत्सल वातावरण निर्माण केले.

या उपक्रमातून आगारातील एकोपा, सहकार्याची भावना आणि पारंपरिक दिवाळीचा सण साजरा करण्याचा सुंदर संदेश देण्यात आला.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.