जिल्हा स्केटिंग संघ निवड चाचणी स्पर्धेत उस्फूर्त प्रतिसाद
कोल्हापूर:
स्केटिंग असोसिएशन कब महाराष्ट्र च्या वतीने मुंबई (विरार) येथे होणाऱ्या३५.व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी रविवार दि.१९रोजी निवड चाचणी घेण्यात आली. या स्पर्धेतील स्पर्धेचे उद्घाटन न्यायाधीश श्री.निलेश रणदिवे यांच्या हस्ते व बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर चंद्रकांत कुंभार, राज्य संघटना उपाध्यक्ष प्रा.डॉ.महेश कदम यांच्या उपस्थित करण्यात आले.
स्पर्धेत यावेळी दक्षिण कोरिया येथे रोप्यपदक मिळवणाऱ्या कोल्हापूरच्या तेजस्विनी कदमचा सत्कार करण्यात आला गडहिंग्लज गारगोटी, कागल इचलकरंजी व कोल्हापूर येथील स्केटिंग खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.
सदर निवड चाचणीतून निवडलेला संघ मुंबई येथे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. स्पर्धेचे संयोजन विश्व चॅम्पियन तेजस्विनी कदम ॲड. धनश्री कदम. पियुष्या सुतार, सौ.आसमी तावडे.ॲड.अश्विनी मेथे. अविनाश पाटील. सागर कुंभार. यांनी स्पर्धेचेआयोजन केले .